England vs Australia 2nd T20I Weather Update: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे.

England vs Australia 2nd T20I Weather Update: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?
ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना (AUS vs ENG 2nd T20I) आज खेळवला जाणार आहे. हा सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिलिप सॉल्ट संघाचे नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.

कार्डिफमध्ये कशी असेल हवामानाची स्थिती?

कार्डिफमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता उभय संघांमधील सामना सुरू होईल. हलके वारे वाहू शकतात. AccuWeather च्या मते, कार्डिफमधील शुक्रवारी परिस्थिती सामन्यासाठी अनुकूल असेल. संध्याकाळचे तापमान सुमारे 9 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. आर्द्रता पातळी 82% वर असेल, परंतु पावसाची शक्यता फक्त 7% आहे. याचा अर्थ पाऊस किंवा वादळाचा कोणताही व्यत्यय न येता चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल.

हे देखील वाचा: England vs Australia 2nd T20I Pitch Report: फलंदाज की गोलंदाज; कार्डिफमध्ये कुणाची जादू चालणार? एका क्लिकवर वाचा पिच रिपोर्ट

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंडचा टी-20 संघ: (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन, रीस टोपले, जॉन टर्नर.

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनी, ॲडम झाम्पा

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).