IND vs AUS 1st Test Probable Playing 11: रोहितच्या जागी केएल राहुल करणार डावाची सुरुवात? तर 'हा' युवा खेळाडू करु शकतो पदार्पण; जाणून घ्या पर्थ कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

नुकताच तो दुसऱ्यांदा वडील झाला आहे. याशिवाय शुभमन गिलला पहिल्या कसोटीत खेळणे कठीण आहे. सरावाच्या वेळी गिलला दुखापत झाली. अशा परिस्थितीत, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते येथे जाणून घ्या.

Team India (Photo Credit - X)

IND vs AUS 1st Test Probable Playing 11: रोहितच्या जागी केएल राहुल करणार डावाची सुरुवात? तर 'हा' युवा खेळाडू करु शकतो पदार्पण; जाणून घ्या पर्थ कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. नुकताच तो दुसऱ्यांदा वडील झाला आहे. याशिवाय शुभमन गिलला पहिल्या कसोटीत खेळणे कठीण आहे. सरावाच्या वेळी गिलला दुखापत झाली. अशा परिस्थितीत, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते येथे जाणून घ्या. (हे देखील वाचा: India vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हे' 8 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार कसोटी सामना, कोणाला मिळणार संधी?)

नितीशकुमार रेड्डी करु शकतो पदार्पण

ऑस्ट्रेलियाला गेलेल्या भारतीय क्रीडा पत्रकारांवर विश्वास ठेवला तर, रोहित शर्माशिवाय शुभमन गिल देखील पर्थ कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यापैकी एकालाच अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. पर्थची खेळपट्टी पाहता युवा अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी पदार्पण करेल, असे मानले जात आहे.

देवदत्त पडिक्कल घेवू शकतो शुभमन गिलची जागा?

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल शुभमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. पडिक्कल भारत-अ संघाकडून ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध खेळला. त्यानेही शानदार फलंदाजी केली. याच कारणामुळे त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

केएल राहुल करु शकतो डावाची सुरुवात?

पर्थ स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल कर्णधार रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात करु शकतो. भारत ऑस्ट्रेलियाला पोहोचण्यापूर्वीच याची पुष्टी झाली होती. रोहितच्या जागी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल. त्याने यापूर्वी कसोटी संघाचे नेतृत्वही केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/आकाशदीप.