SL vs BAN Asia Cup 2023: कोण करणार नागिन डान्स? आज श्रीलंका - बांगलादेश आमनेसामने; वाचा दुसऱ्या सामन्याशी संबंधित खास गोष्टी
भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून विजयी सुरुवात करायची आहे.
आशिया चषकात (Asia Cup 2023) गुरुवारी श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव करत विजयाची सलामी दिली आहे. तसेच आजचा दुसरा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर (Pallekele Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून विजयी सुरुवात करायची आहे. दुसरीकडे, श्रीलंका आशिया कप 2022 चा विजेता राहिला आहे. जरी स्वरूप वेगळे असले तरी श्रीलंका अजूनही ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह?
भारतातील आशिया कपचे मीडिया हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. टीव्हीवर, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर याचा आनंद घेता येईल. तर ओटीटी वर, चाहत्यांना हॉटस्टारवर एशिया कपचे सर्व सामने पाहता येतील. यासोबतच तुम्हाला जिओ सिनेमावर भारतातील सामन्यांचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होतील. टॉसची वेळ दुपारी 2.30 वाजता असणार आहे.
पल्लेकेले स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?
पल्लेकेले येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अधिक कठीण असल्याने लक्ष्याचा पाठलाग करणे थोडे कठीण होऊ शकते. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार या विकेटवर प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करेल. (हे देखील वाचा: अरेरे! Asia Cup 2023 च्या पहिल्याच सामन्यात Pakistan झाला ट्रोल, चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा)
दोन्ही देशीची संभाव्य प्लेइंग 11
बांगलादेश: मोहम्मद नईम, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार). तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद आणि शोरफुल इस्लाम.
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश थेक्षाना, मथिशा पाथिराना आणि कसून राजिथा.