CSK vs PBKS, IPL 2024 Pitch Report: चेन्नईच्या मैदानावर कोणाचे असणार वर्चस्व? गोलंदांज की फलंदांज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
CSK vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात बुधवार, 1 मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. (हे देखील वाचा: CSK vs PBKS Head to Head: पंजाब किंग्ससमोर असणार चेन्नई सुपर किंग्जचे तगडे आव्हान, आकडेवारीत कोण असणार वरचढ; घ्या जाणून)
चेन्नई विरुद्ध पंजाब खेळपट्टी अहवाल
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. हे ठिकाण अनेक वर्षांपासून संथ खेळपट्टीसाठी ओळखले जाते. मात्र, चालू मोसमात एक सामना वगळता फलंदाजी चांगली झाली आहे. या सामन्यात फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांना संथ आणि रुंद यॉर्कर्स वापरावे लागतील. अन्यथा फलंदाज वर्चस्व गाजवतील अशी अपेक्षा आहे. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये फलंदाजांना मैदानाचा फायदा घ्यावा लागेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवन दुबे, समीर रिझवी, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल.