NZ vs PAK Head to Head: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कोण आहे वरचढ, जाणून घ्या किती वेळा आले आमनेसामने
या 11 सामन्यांपैकी पाकिस्तानचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे, तर न्यूझीलंडने केवळ चार वेळा विजय मिळवला आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) 16व्यांदा आमनेसामने येणार आहेत. टी-20 विश्वचषकाच्या उंपात्य फेरीत आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या अधिक चांगला दिसत आहे, परंतु 9 नोव्हेंबरला सिडनी येथे जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने होतील तेव्हा पाकिस्तानचा संघही स्पर्धा करताना दिसणार आहे. खरं तर, जर आपण न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड (NZ vs PAK Head to Head) बद्दल बोललो तर, वनडे आणि T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 15 सामने खेळले गेले आहेत. या 11 सामन्यांपैकी पाकिस्तानचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे, तर न्यूझीलंडने केवळ चार वेळा विजय मिळवला आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ 6 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 4 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तान वरचढ
इतकंच नाही तर आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी तीन वेळा पाकिस्तान संघ विजयी झाला आहे, तर किवी संघाने दोन वेळा विजय मिळवला आहे. 2007 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला पराभूत करूनच अंतिम फेरी गाठली होती. अशा स्थितीत किवी संघाला बदला घेण्याची आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. (हे देखील वाचा: NZ vs Pak Semifinal Live streaming Online: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार उपांत्य फेरीचा सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)
पाकिस्तानचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास चढ-उताराचा
पाकिस्तानचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास चढ-उताराचा होता, पण न्यूझीलंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आयर्लंडचा पराभव करून गट एकमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. सुपर 12 मध्ये भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर बाबर आझम आणि त्याचा संघ लवकरच मायदेशी परतण्याच्या तयारीत होता, परंतु नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पाकिस्तानच्या आशांना पंख दिले, आणि त्यांनी बांग्लादेशचा पराभव करुन उंपात्य फेरीत प्रवेश केला.