Who is Morne Morkel: कोण आहे भारताचा नवा गोलंदाज प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल? ज्यासाठी हेड कोच गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर केला होता अट्टाहास

मॉर्नी मॉर्केल बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेने टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे.

Gautam Gambhir And Morne Morckalc (Photo Credit - X)

Morne Morkel: मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मॉर्ने मॉर्केलच्या नावाची आधीच चर्चा होत होती. मॉर्नी मॉर्केल यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मॉर्नी मॉर्केलने यापूर्वीही गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे. मॉर्नी मॉर्केल बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेने टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे. तो प्रशिक्षक बनल्यानंतर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोण आहे मॉर्नी मॉर्केल ज्यावर हेड कोच गौतम गंभीरच्या आग्रहानुसार बोर्डाने विश्वास व्यक्त केला आहे.

मॉर्नी मॉर्केलने प्रथमच आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून केले काम

मॉर्नी मॉर्केल हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील एक मोठे नाव आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आफ्रिकन संघासाठी 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या होत्या. मोर्ने मॉर्केलने आफ्रिकेसाठी 86 कसोटीत 309 विकेट्स, 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट्स आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 47 विकेट घेतल्या आहेत. मॉर्नी मॉर्केलने प्रथमच आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले. तो 2022 आणि 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होता. या काळात गौतम गंभीर लखनौचा मेंटर असायचा.

मॉर्नी मॉर्केलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काम

मॉर्नी मॉर्केलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाबद्दल बोलायचे तर, तो भारतापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान मॉर्केल पाकिस्तान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. मात्र, विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर मॉर्नी मॉर्केलने गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तान संघानंतर तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनला नाही. (हे देखील वाचा: Dodda Ganesh: माजी भारतीय क्रिकेटपटू डोडा गणेश यांच्यावर मोठी जबाबदारी, केनिया पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती)

मॉर्नी मॉर्केल आणि गंभीर चांगले मित्र

मॉर्नी मॉर्केल आणि गंभीर हे देखील खूप चांगले मित्र आहेत. गौतम गंभीरनेच बीसीसीआयला मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची सूचना केली होती. बोर्डाने प्रशिक्षक गंभीर यांचे म्हणणे मान्य केले असून मॉर्केलला भारतीय संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. आता आशा आहे की मॉर्केलसह भारतीय वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करतील.