DC vs RR Head to Head: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात कोण आहे वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी

या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

DC vs RR Head to Head: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात कोण आहे वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी
DC vs RR (Photo Credit: X)

DC vs RR IPL 2025 32nd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025 चा 32 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. (हे देखील वाचा: DC vs RR IPL 2025 32nd Match Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मध्ये रंगणार रोमांचक सामना, तुम्ही येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद)

हेड टू हेड आकडेवारी (DC vs RR Head To Head In IPL)

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 सामने खेळले गेले आहेत. राजस्थान संघाने 15 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 14 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या 5 सामन्यांमध्येही राजस्थानने वरचढ कामगिरी केली आहे. राजस्थानने 3 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 2 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ 9 वेळा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये डीसीने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर, राजस्थानला फक्त 3 वेळा विजय मिळवता आला आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, केएल राहुल, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, डोनोवन फरेरा.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुल जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष थेक्षाना, संदीप शर्मा, आकाश मधवाल.

(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2025 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).