New Zealand vs England 1st Test 2024 Day 3 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळाला कधी होणार सुरुवात? कुठे पाहणार लाइव्ह? जाणून घ्या एका क्लिकवर
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 74 षटकांत 5 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ सध्या न्यूझीलंडपेक्षा 29 धावांनी मागे आहे. सध्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक 163 चेंडूत नाबाद 132 धावा आणि बेन स्टोक्स 76 चेंडूत 37 धावा करून नाबाद आहे.
New Zealand National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 3 Live Streaming: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. सामन्याचा तिसरा दिवस 30 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 74 षटकांत 5 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ सध्या न्यूझीलंडपेक्षा 29 धावांनी मागे आहे. सध्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक 163 चेंडूत नाबाद 132 धावा आणि बेन स्टोक्स 76 चेंडूत 37 धावा करून नाबाद आहे. याशिवाय बेन डकेट 46 धावा करून, जेकब बेथेल 10 धावा करून आणि ओली पोप 77 धावा करून बाद झाले. तर जॅक क्रॉली खाते न उघडताच बाद झाला. तर न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने 18 षटकांत 86 धावा देत सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय विल्यम ओ'रुर्के, टिम साऊदी आणि मॅट हेन्री यांनी 1-1 विकेट घेतली.
दुसऱ्या दिवशी किवी संघ 348 धावांवर बाद
तिसरा दिवस दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या दिवशी किवी संघ 348 धावांवर बाद झाला. किवी संघासाठी ग्लेन फिलिप्सने 87 चेंडूत 58 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. याशिवाय केन विल्यमसन 197 चेंडूत 93 धावा करून बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. शोएब बशीर आणि ब्रायडन कारसे यांनी इंग्लंडकडून पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली. शोएब बशीरने 20 षटकांत 69 धावा देऊन 4 बळी घेतले तर ब्रेडन कार्सने 19 षटकांत 64 धावांत 4 बळी घेतले.
हे देखील वाचा: Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्सने घेतला आश्चर्यकारक झेल! क्षेत्ररक्षक, प्रेक्षक सगळेच अचंबित (पाहा व्हिडिओ)
कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या भारतात टीव्हीवर न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून सामन्याचा आनंद घेवू शकतात.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साउथी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2024 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

