Domestic Cricket Schedule 2023-24: रणजी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कधी होणार? येथे पहा देशांतर्गत क्रिकेटचे संपूर्ण वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच आगामी देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले, ज्या अंतर्गत पुढील वर्षी 28 जून ते मार्च या कालावधीत विविध देशांतर्गत स्पर्धा होणार आहेत.

Domestic Cricket (Photo Credit - Twitter)

आयपीएल 2023 (IPL 2023) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC Final 2023) आता भारतीय देशांतर्गत हंगाम सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच आगामी देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक (Domestic Cricket Schedule 2023-24) जाहीर केले, ज्या अंतर्गत पुढील वर्षी 28 जून ते मार्च या कालावधीत विविध देशांतर्गत स्पर्धा होणार आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यावर्षी दुलीप करंडक, देवाधर करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक, विजय हजारे करंडक आणि रणजी करंडक यांसारख्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सर्व सीनियर आणि ज्युनियर खेळाडू अप्रतिम कामगिरी करताना दिसणार आहेत. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक सामन्यांबाबत पाकिस्तानचे नखरे कमी नाही, अफगाणिस्तानला घाबरत आयसीसीसमोर ठेवली 'ही' मागणी)

भारतीय देशांतर्गत हंगाम 2023-2024 चे पूर्ण वेळापत्रक

  1. दुलीप करंडक - 28 जून ते 16 जुलै
  2. देवधर करंडक - 24 जुलै ते 4 ऑगस्ट
  3. इराणी चषक - 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर
  4. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी - 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर
  5. विजय हजारे ट्रॉफी - 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर
  6. रणजी करंडक - 5 जानेवारी 2024 ते 14 मार्च

रणजी ट्रॉफीमधील लीग टप्प्यातील सामने 19 फेब्रुवारीपर्यंत खेळवले जातील. त्यानंतर 23 फेब्रुवारीपासून बाद फेरीचे सामने सुरू होतील. या ट्रॉफीमध्ये 2 विभाग असतील. आठ संघांचे चार गट एलिट विभागात असतील आणि सहा संघांचा एक गट प्लेट विभागात असेल.