WPL 2024 RCB Schedule: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे सर्व सामने कधी अन् कुठे खेळेवले जाणार, संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

या स्पर्धेतील पहिला सामना 23 फेब्रुवारी रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

RCB (Photo Credit - Twitter)

WPL 2024 RCB Schedule: महिला प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचे सामने बेंगळुरू आणि दिल्ली येथे होणार आहेत. डब्ल्यीपाएल सीझन 2 बेंगळुरूमध्ये सुरू होईल, तर नाॅकआऊट आणि अंतिम सामने दिल्लीत खेळवले जातील. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्च रोजी होणार आहे. महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक मंगळवारीच जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 23 फेब्रुवारी रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) पहिला सामना 24 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे यूपी वॉरियर्स विरुद्ध (RCB vs UP) होणार आहे. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील आरसीबी त्यांचे पहिले पाच सामने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळतील, तर त्यांचे शेवटचे तीन सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील.

आगामी हंगामात आरसीबी संघ पुनरागमन करेल आणि चमकदार खेळ दाखवण्यासाठी मैदानात उतरेल. आरसीबीची कमान स्मृती मानधना यांच्या हातात आहे. या संघात ॲलिस पेरी, सोफी डिव्हाईन आणि काही उदयोन्मुख तरुण चेहरे मेगन शुट, श्रेयंका पाटील आणि रेणुका सिंग यांचा समावेश आहे. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Milestone: यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटीत रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज)

डब्ल्यीपाएल 2024 मध्ये आरसीबीचे वेळापत्रक

24 फेब्रुवारी- RCB विरुद्ध यूपी वॉरियर्स, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (सायं 7:30)

27 फेब्रुवारी- RCB विरुद्ध गुजरात टायटन्स, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (7:30 PM)

29 फेब्रुवारी- RCB विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (7:30 PM)

मार्च 02- RCB विरुद्ध मुंबई इंडियन्स, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (7:30 PM)

मार्च 04- RCB विरुद्ध यूपी वॉरियर्स, एम चिन्नास्वामी स्टेडियम, दिल्ली (सायंकाळी 7:30)

मार्च 06- RCB विरुद्ध गुजरात टायटन्स, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली (PM 7:30)

10 मार्च- RCB विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली (PM 7:30)

12 मार्च- RCB विरुद्ध मुंबई इंडियन्स, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली (PM 7:30)

डब्ल्यूपीएल 2024 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पूर्ण संघ: स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, हीदर नाइट, आशा शोभना, दिशा कासट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, सोफी डेविन, जोर्डिया क्रोश , एकता बिष्ट, शुभा सतीश, एस मेघना, सिमरन बहादूर, सोफी मॉलिनक्स.