IND vs PAK, World Cup 2023: आज पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना वाहून गेला तर काय होणार? येथे जाणून घ्या राखीव दिवसाचा नियम
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.
मुंबई: आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणाऱ्या शानदार सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. यावर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवला जात आहे. यजमान संघ असल्याने टीम इंडिया विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून आपले आव्हान सादर करेल. त्याचबरोबर पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारखे संघही आशियाई परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छितात. आगामी विश्वचषकातही काही महत्त्वाचे विक्रम धोक्यात येणार आहेत.
पावसामुळे सामना वाहून गेला तर राखीव दिवस असेल का?
अहमदाबादमध्ये पावसामुळे आज भारत-पाकिस्तान सामना वाहून गेला, तर सामन्यात काय होणार? प्रत्येक चाहत्याच्या मनात हा मोठा प्रश्न आहे. असे झाल्यास सामना रद्द होईल आणि दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागेल. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये लीग सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. या स्पर्धेत फक्त उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK World Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज होणार रोमांचक सामना, आजच्या सामन्यात होवू शकतात 'हे' मोठे विक्रम)
काय आहे हवामना अपडेट
अहमदाबादच्या हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, पुढील 5 दिवस हवामान किंचित दमट राहणार आहे. पण सामन्याच्या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. हवामान खात्याने सांगितले की, सामन्याच्या दिवशी हलका पाऊस पडू शकतो, परंतु बहुतांशी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. दुपारी भरपूर सूर्यप्रकाश असेल.
दोन्ही संघांचे विश्वचषक संघ
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, आगा सलमान, फखर जमान, उसामा मीर , मोहम्मद वसीम जूनियर
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)