WI W vs BAN W 2nd T20 2025 Live Streaming: वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील सान्याचे भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पहाल?
वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 30 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव केला होता.
West Indies Women Cricket Team vs Bangladesh Women National Cricket Team 2nd T20 2025 Live Streaming: वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (WI W vs BAN W) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना 30 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट किट्समधील बासेटेरे येथील वॉर्नर पार्क येथे खेळला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह, यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या टी-20 मध्ये, वेस्ट इंडिज मालिका जिंकण्याच्या इराद्याने प्रवेश करेल. दुसरीकडे, बांगलादेश संघ दुसऱ्या टी-20 मध्ये पुनरागमन करू इच्छितो. बांगलादेश मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.(Sri Lanka vs Australia 1st Test 2025 Day 1 Live Streaming: श्रीलंका-ऑस्ट्रेलिया आमनेसामने; भारतात पहिला कसोटी सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?)
बांगलादेश महिला आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यातील दुसरा टी 20 सामना कधी खेळला जाईल?
बांगलादेश महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला यांच्यातील दुसरा टी20 सामना गुरुवारी 30 जानेवारी रोजी पहाटे 4.30 वाजता वॉर्नर पार्क, बासेटेरे, टी किट्स येथे खेळला जाईल.
बांगलादेश महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यातील दुसरा टी20 सामना कुठे पाहायचा?
भारतात बांगलादेश महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण होण्याची कोणतीही माहिती नाही. तर लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
वेस्ट इंडिज महिला संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), कियाना जोसेफ, डिएंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, आलिया अॅलेन, शाबिका गजनाबी, झैदा जेम्स, अफी फ्लेचर, करिश्मा रामहारॅक, चेरी अँन फ्रेझर, जेनिलिया ग्लासगो , मॅंडी मंगरू, अश्मिनी मुनिसर
बांगलादेश महिला संघ: निगार सुलताना (कर्णधार आणि विकेटकीपर), शोभना मोस्तारी, मुर्शिदा खातून, शर्मिन अखतर, ताज नेहार, शोर्ना अखतर, राबेया खान, नाहिदा अखतर, मारुफा अखतर, संजिदा अखतर मेघला, फरिहा त्रिस्ना, फरगाना हक, फहिमा खातून, लता. मंडल, दिलारा अख्तर, सुलताना खातून
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 11:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

