Sri Lanka vs Australia 1st Test 2025 Day 1 Live Streaming: श्रीलंका-ऑस्ट्रेलिया आमनेसामने; भारतात पहिला कसोटी सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Sri Lanka vs Australia 1st Test 2025 Day 1 Live Streaming: श्रीलंका-ऑस्ट्रेलिया आमनेसामने; भारतात पहिला कसोटी सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Photo Credit- X

Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team 1st Test 2025 Day 1 Live Streaming: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (SL vs AUS) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आज म्हणजे 29 जानेवारी रोजी गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. गॅले मैदान श्रीलंकेसाठी नेहमी चांगलेच ठरले आहे. श्रीलंकेची रणनीती त्यांच्या घरच्या मैदानाचा फायद्याची राहिली आहे. या मालिकेत धनंजय डी सिल्वा श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे. तर स्टीव्ह स्मिथ च्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व आहे. पॅट कमिन्स आणि मिशेल मार्शसारखे स्टार खेळाडू संघाचा भाग नाहीत.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याची वेळ?

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आज म्हणजेच बुधवारी 29 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना कुठे पाहायचा?

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे भारतातील टीव्हीवर थेट प्रक्षेपण होण्याची कोणतीही माहिती नाही. लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

श्रीलंका: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निस्सांका (तंदुरुस्तीच्या अधीन), ओशादा फर्नांडो, लाहिरू उदारा, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, सोनल दिनुशा, प्रभात जयसूर्या, जेफ्री वँडरसे, निशान पेरीस, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके.

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 09:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).