West Indies: सलग चार सामने पराभूत झालेल्या वेस्ट इंडिजला आयसीसीने दिला दणका, नियम मोडल्याबद्दल दंड

आयसीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करून याची पुष्टी केली आहे.

West Indies (Photo Credit - Twitter)

भारताविरुद्ध सलग चार सामने पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाला (WI Team) आयसीसीने (ICC) मोठा धक्का दिला आहे. निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाला भारताविरुद्धच्या (IND vs WI) पहिल्या T20I दरम्यान स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करून याची पुष्टी केली आहे. आयसीसी एलिट पॅनलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी केल्याबद्दल वेस्ट इंडिजला दंड ठोठावला. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 (किमान ओव्हर-रेट बाबत) अन्वये खेळाडू आणि संघाच्या सहयोगी सदस्यांसाठी, जर संघ निर्धारित वेळेत निर्धारित षटके टाकू शकला नाही, तर खेळाडूंना त्यांच्या मॅच फीपैकी 20 रक्कम आकारली जाईल. प्रत्येक षटकासाठी तेवढा दंड आकारला जातो.

निकोलस पूरनने चूक केली मान्य

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने स्लो ओव्हर रेटबाबत आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील सुनावणी किंवा कारवाईची गरज नाही. मैदानावरील पंचांनी स्लो ओव्हर रेटबाबत तक्रार केली होती. (हे देखील वाचा: Virat Kohli On Asia Cup 2022: विराट कोहली खेळणार आशिया कप? सेलेक्टर्सना सांगितला प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण)

भारताने पहिला T20I 68 धावांनी जिंकला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. तत्पूर्वी, भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना 68 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने 64 धावांची अप्रतिम खेळी केली. रोहित शिवाय दिनेश कार्तिकने 19 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 41 धावा केल्या.