WI vs SA T20I Head to Head: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार टी-20 लढत, आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व? वाचा एका क्लिकवर

भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजता दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जाईल.

WI vs SA (Photo Credit - X)

West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: कसोटी मालिकेनंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना शनिवारी 24 ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या (Trinidad) ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजता दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जाईल. (हे देखील वाचा: WI vs SA 1st T20I Live Streaming: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार टी-20 चा थरार! शनिवारी पहिला सामना; कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून)

विश्वचषक पराभवनंतर दक्षिण आफ्रिका उतरणार मैदानात

वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे असेल. तर एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बार्बाडोस येथे टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमान असूनही वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाही.

आकडेवारीत कोण आहे वरचढ?

आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 12 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजने 11 सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर खेळताना, वेस्ट इंडिज संघाने दक्षिण आफ्रिकेचा 5 टी-20 सामन्यांमध्ये पराभव केला आहे आणि 6 टी-20 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कशी आहे खेळपट्टी

दोन्ही संघांमधील हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आतापर्यंत या मैदानावर एकूण 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत पाठलाग करणाऱ्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 128 धावांची आहे. त्रिनिदादच्या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत मिळते.

दोन्ही संघाचे खेळाडू

वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), ॲलिक अथानाझे, फॅबियन ॲलन, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्रक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, क्वेना माफाका, विआन मुल्डर, लुंगी एन्गिडी, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रस्सेन ड्यूसेन आणि लिझाद विल्यम्स.

 



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना