WI vs BAN Test Series 2024 Schedule: वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या कधी, कुठे कसा खेळवले जाणार सामने
वेस्ट इंडिज संघाने नुकतीच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. ज्यामध्ये त्यांना 1-0 ने पराभवाचा सामना करावा लागला.
West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Test Series 2024 Schedule: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश (WI vs BAN) क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. वेस्ट इंडिज संघाने नुकतीच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. ज्यामध्ये त्यांना 1-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत यजमान संघाला घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे. दुसरीकडे, बांगलादेशला नुकतीच दक्षिण आफ्रिकेकडून घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश संघ वेस्ट इंडिजला कडवे आव्हान देऊ इच्छितो. (हेही वाचा:IND vs AUS Test Record: ऑस्ट्रेलियात भारताची कशी आहे कामगिरी? आतापर्यंत भारताने किती जिंकले सामने? जाणून घ्या कसोटी इतिहास )
बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. सीनियर खेळाडू मुशफिकुर रहीमला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. शारजाहमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या वनडे दरम्यान विकेट कीपिंग करताना मुशफिकुर रहीमच्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. ज्यामुळे त्याला सध्याच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडावे लागले आणि आता तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
मुशफिकर रहीमला बरे होण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर पडू शकतो. बांगलादेशचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध अँटिग्वा येथे होणार आहे. कसोटी मालिकेनंतर बांगलादेशला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
याशिवाय बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला असून पाठीच्या दुखापतीमुळे त्याचे वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणे साशंक आहे.
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी संघ: नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक शोराब, महिदुल इस्लाम अंकोन, लिटन दास (विकेटकीपर), झाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज (उपकर्णधार) , तैजुल इस्लाम, शोरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, हसन मेहमूद, नाहिद राणा, हसन मुराद.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश कसोटी वेळापत्रक 2024
पहिली कसोटी - 22 ते 26 नोव्हेंबर, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
दुसरी कसोटी - 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, जमैका