West Indies vs Bangladesh 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार तिसरा सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना घ्या जाणून?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 37 षटकांत 1 गडी गमावून 70 धावा केल्या होत्या.

Photo Credit- X

West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: वेस्ट इंडिज-बांगलादेश (WI vs BAN) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस 2 डिसेंबर (West Indies vs Bangladesh 2nd Test 2024) रोजी होणार आहे. जमैकाच्या किंग्स्टन येथील सबिना पार्क येथे सामना होईल. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 37 षटकांत 1 गडी गमावून 70 धावा केल्या होत्या. यजमान संघ अजूनही पाहुण्या संघापेक्षा 94 धावांनी मागे आहे. वेस्ट इंडिजसाठी क्रेग ब्रॅथवेट 115 चेंडूत 33 आणि केसी कार्टी 60 चेंडूत 19 धावांवर खेळत आहेत. याशिवाय मायकेल लुईस 12 धावा करून बाद झाला आहे. बांगलादेशकडून पहिल्या डावात नाहिद राणाने आतापर्यंत 9 षटकात 28 धावांत 1 विकेट घेतली आहे. तिसरा दिवस दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. (हेही वाचा: Bangladesh Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Streaming In India: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल थेट सामना?)

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा पहिला डाव 71.5 षटकात 164 धावांवर आटोपला होता. बांगलादेशकडून शादमान इस्लामने 137 चेंडूत सर्वाधिक 64 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजसाठी जेडेन सील्सने 15.5 षटकात 5 धावा देत 10 मेडन आणि 4 विकेट घेतल्या. याशिवाय शामर जोसेफने 3 आणि केमार रोचने 2 बळी घेतले. तर अल्झारी जोसेफला 1 विकेट मिळाली.

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस कधी खेळला जाईल?

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ आज सोमवारी 2 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता किंग्स्टन, जमैका येथील सबिना पार्क येथे खेळला जाईल.

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ कुठे पाहायचा?

आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश T20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

वेस्ट इंडीज: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, केसी कार्टी, कावेम हॉज, ॲलेक अथानाझे, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, केमार रोच, जेडेन सील्स, शामर जोसेफ

बांगलादेश: महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, शहादत हुसैन दिपू, मोमिनुल हक, लिटन दास (विकेटकीपर), जाकर अली, मेहदी हसन मिराज (कर्णधार), तैजुल इस्लाम, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा