West Indies vs Bangladesh 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने केला पराभव, शेरफेन रदरफोर्डने झळकावले शानदार शतक; येथे पाहा स्कोअरकार्ड

वेस्ट इंडिजकडून या सामन्यात शेरफेन रदरफोर्डने शतक झळकावले. रदरफोर्डने 80 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होईने 88 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या.

West Indies vs Bangladesh 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने केला पराभव, शेरफेन रदरफोर्डने झळकावले शानदार शतक; येथे पाहा स्कोअरकार्ड
Sherfane Rutherford (Photo Credit - X)

West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 1st ODI 2024 Scorecard: वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 8 डिसेंबर रोजी वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स येथे खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला. यासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजकडून या सामन्यात शेरफेन रदरफोर्डने शतक झळकावले. रदरफोर्डने 80 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होईने 88 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या.

मेहदी हसन मिराजने केल्या 74 धावा

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने 6 गडी गमावून 294 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार मेहदी हसन मिराजने 101 चेंडूत सर्वाधिक 74 धावा केल्या. यादरम्यान मेहदी हसन मिराजने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय तनजीद हसनने 60 धावा, सौम्या सरकार 19 धावा, अफिफ हुसेन 28 धावा, महमुदुल्लाह 50 धावा आणि झकर अलीने 48 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजसाठी रोमॅरियो शेफर्डने 10 षटकात 51 धावा देऊन सर्वाधिक 1 मेडन षटक आणि 3 बळी घेतले. तर अल्झारी जोसेफला 2 आणि जेडेन सील्सला एक विकेट मिळाली.

शेरफेन रदरफोर्डने झळकावले शानदार शतक

295 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नॉर्थ वेस्ट इंडिज संघाने 47.4 षटकात 6 गडी गमावून 295 धावा करत सामना जिंकला. यजमान संघासाठी शेरफेन रदरफोर्डने 80 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. तर कर्णधार शाई होईने 88 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. याशिवाय केसी कार्टीने 21 धावा, जस्टिन ग्रीव्हजने 41 धावा आणि एविन लुईसने 16 धावा केल्या. तर बांगलादेशकडून तंजीम हसन साकिब, नाहिद राणा, रिशाद हुसेन, मेहदी हसन मिराज आणि सौम्या सरकार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2024 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).