2023 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी आरोन फिंच याच्यासोबत करणार ओपनिंग? पाहा काय म्हणाला डेविड वॉर्नर
या विजयानंतर वॉर्नरला विचारण्यात आले की तो फिंचबरोबर विश्वचषक 2023 मध्ये खेळणार का? यावर त्याने एक मजेदार उत्तर दिले.
मंगळवारी ऑस्ट्रेलियाची (Australia) सलामी जोडी कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात भारत (India) विरुद्ध जोरदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 10 विकेटने विजय मिळवून दिला. या विजयानंतर वॉर्नरला विचारण्यात आले की तो फिंचबरोबर विश्वचषक (World Cup) 2023 मध्ये खेळणार का? यावर त्याने एक मजेदार उत्तर दिले. भारताने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात वॉर्नर आणि फिंचने पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड 258 धावांची भागीदारी केली. वॉर्नर 128 धावा करून आणि फिंच 110 धावांवर नाबाद राहिले. यानंतर हे दोघेही 2023 मध्ये विश्वचषक स्पर्धेत डावाची सुरुवात करण्याचा विचारत आहेत का असे विचारले असता वॉर्नरने एक रंजक प्रतिक्रिया दिली. वॉर्नरने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि म्हणाला की असे करण्यापूर्वी आम्हा दोघांनाही आमच्या पत्नींना विचारावे लागेल. (IND vs AUS 2nd ODI: रिषभ पंत राजकोटमधील दुसर्या वनडे सामन्यातून बाहेर, आता 'हा' खेळाडू करू शकतो विकेटकीपिंग)
वॉर्नर म्हणाला की, "आम्हाला आमच्या पत्नींना याविषयी प्रथम विचारावे लागेल. त्यावेळी आम्ही दोघेही 36-37 वर्षांचे झालेले असोत. मला तीन मुलं आहेत आणि आम्ही एका वेळी एक पाऊल पुढे ठेवू. सध्या आमचे लक्ष राजकोटच्या दुसर्या वनडे सामन्यावर आहे." जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरने भारताविरुद्ध मालिकेच्या पहिल्या वनडे सामन्यात 112 चेंडूत17 चौकार आणि तीन षटकारांसहनाबाद 128 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचनेही नाबाद 110 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाने भारतीय संघाची वास्तविक स्थिती सर्वांच्या समोर आणली. शिवाय, टीम इंडियाचा माध्यम क्रम अजून कमकुवत होताना दिसत आहे. रिषभ पंत याला मुंबईतील सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने दुसऱ्या सामन्याला मुकावे लागत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता 17 जानेवारी रोजी राजकोटमध्ये दुसऱ्या वनडे सामन्यात आमने-सामने येतील, तर मालिकेचा अंतिम सामना 19 जानेवारी बेंगलुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाईल.