व्हिडिओ: असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल! स्ट्राइक बॅट्समनने टोलावलेला चेंडू नॉन स्ट्राइक बॅट्समनच्या बॅटला लागून खेळाडू आऊट

पण, व्हिडिओत दिसतो तसा विचित्र झेल कधी तुम्ही पाहिला आहे काय? विचित्र म्हणजे नेमका कसा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच पाहावा लागेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यादरम्यान हा झेल टीपण्यात आला.

CRICKET | (Photo Credits-Twitter)

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ (Australia Women Cricket) आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ (New Zealand Women Cricket) यांच्यात सामना सुरु होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी न्यूझीलंड (New Zealand ) मैदानात होता. न्यूझीलंडची केटी पेरकिन्स ही चार धावा काढून स्ट्राईकला होती. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) हिथर ग्रॅहम गोलंदाजी करत होती. हिथर ग्रॅहम हिने चेंडू टाकला. केटीने तो फटकावला. हा फटकाही काही विशेष नव्हता. परंतू, चेंडू तेट नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिन हिच्या बॅटवर आदळला. असे काही घडेल यांची कसलीच कल्पना कोणाला नव्हती. स्वत: केटी पेरकिन्स, हिथर ग्रॅहम किंवा नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिन हिनेही तसे वाटले नव्हते. मार्टिन हिच्या बॅटला लागलेला चेंडू पुन्हा एकदा हवेत उडाला. ही संधी साधून जवळच उभ्या असलेल्या ग्रॅहमने हा झेल अचूक टीपला आणि पंचांकडे झेलबाद झाल्याचे अपील केले.

पंचांपूढे पेच निर्माण झाला निर्णय काय द्यायचा. आपील आल्यामुळे निर्णय तर द्यावा लागणारच होता. पंचांचाही काही क्षण गोंधळ उडाला. त्यांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनी आवश्यक वेळ घेतला. घटना अभ्यासली आणि निर्णय दिला. पंचाच्या निर्णयानुसार पेरिकिनन्स बाद ठरली. हा निर्णय दोन्ही कडील खेळाडूंनी स्वीकारला. पण, घडलेल्या अनपेक्षीत घटनेने मैदानावरील सर्वच खेळाडू आणि पंचांनाही हसू आवरले नाही. सर्वांनी हा अनपेक्षीत प्रसंग खिलाडू वृत्तीने साजरा केला. (हेही वाचा, Video: भाजप आमदार प्रविण दरेकर मैदानावर शॉट मारायला गेले अन भूईसपाट झाले)

क्रिकेट सामना सुरु असताना विक्रम, उत्सुकता, थरार अशा अनेक गोष्टी एक क्रीडा रसिक म्हणून आपण अनेकदा पाहिल्या, अनुभवल्या असतील. पण, व्हिडिओत दिसतो तसा विचित्र झेल कधी तुम्ही पाहिला आहे काय? विचित्र म्हणजे नेमका कसा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच पाहावा लागेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यादरम्यान हा झेल टीपण्यात आला.