Virat Kohli Milestone: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर विशेष कामगिरी, सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले
आता विराट कोहली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत विराट कोहलीने वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.
IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) दुसऱ्या डावात आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. यानंतर आता विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. एक विशेष कामगिरी करत विराट कोहलीने आता टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांना मागे टाकले आहे. (हे देखील वाचा: Team India: भारतीय कर्णधारांनी 'या' विरोधी संघाला घाम फोडला, सलग आंतरराष्ट्रीय सामने जिंकले; येथे पाहा संपूर्ण यादी)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज
सेंच्युरियन मैदानावर विराट कोहलीने दुसऱ्या डावात 76 धावांची खेळी केली. आता विराट कोहली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत विराट कोहलीने वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या आता कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8790 धावा झाल्या आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 8781 धावा आहेत. या यादीत टीम इंडियाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव प्रथम येते. सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा आहेत, आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही. सचिन व्यतिरिक्त राहुल द्रविडच्या नावावर 13265 आणि सुनील गावस्करच्या नावावर 10122 धावा आहेत.
सेंच्युरियन कसोटीत विराटने केल्या 114 धावा
विराट कोहलीने सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात ३८ धावा आणि दुसऱ्या डावात ७६ धावा केल्या. विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 114 धावा केल्या. विराट कोहली दुसऱ्या डावात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता पण त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही भारतीय फलंदाजाची साथ मिळाली नाही. विराट कोहली एका बाजूला उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. शेवटी विराटने टीम इंडियाला एवढ्या मोठ्या पराभवापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराटने आपली विकेट गमावली.