Virat Kohli's Fight Against Depression: विराट कोहलीने डिप्रेशनबाबत सोडले मौन, उदासीनतेविरुद्ध लढाईचा केला खुलासा
2014 मध्ये इंग्लंड दौर्यावर अपयशी ठरला असताना तो नैराश्याने ग्रस्त असल्याचे विराटने सांगितले.
Virat Kohli's Fight Against Depression: टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मानसिकदृष्ट्या बलवान क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो, पण मानसिकदृष्ट्या बलवान खेळाडूला देखील एका वेळी उदासीनतेशी (Depression) लढा द्यावा लागला होता. 2014 मध्ये इंग्लंड दौर्यावर (India Tour of England 2014) अपयशी ठरला असताना तो नैराश्याने ग्रस्त असल्याचे विराटने सांगितले. विराटने सांगितले की जेव्हा तो सतत अपयशी होत असता तेव्हा त्याला आपण एकटे असल्याचे वाटू लागले. इंग्लंडचा माजी खेळाडू मार्क निकोलसशी (Mark Nicholas) झालेल्या संभाषणात कोहलीने कबूल केले की त्या दौऱ्यादरम्यान तो आपल्या कारकिर्दीच्या कठीण काळातून गेला होता. कोहलीला कधी नैराश्यात आहे का असे विचारले असता तो म्हणाला, "हो, हे माझ्या बाबतीत घडले. आपण धावा करण्यास सक्षम नाही असा विचार करणे चांगले नव्हते आणि मला वाटते की सर्व फलंदाजांना असे वाटते की कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नाही." (IND vs ENG 2nd Test 2021: Virat Kohli याला नडले ‘हे’ गोलंदाज, होम ग्राउंडमध्ये Golden Duck वर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता)
2014 चा इंग्लंड दौरा कोहलीसाठी निराशाजनक होता. त्याने पाच कसोटी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 13.50 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यावर कोहलीने त्यावेळी 1, 8, 25, 0, 39, 28, 0,7, 6 आणि 20 अशा धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याने 692 धावा करत शानदार पुनरागमन केले. इंग्लंड दौऱ्याबद्दल तो म्हणाला की, "त्यावर मात कशी करावी हे आपणास माहित नाही. हा काळ होता जेव्हा मी गोष्टी बदलण्यासाठी काहीही करू शकत नव्हतो. मला वाटलं की मी जगात एकटा आहे." कोहलीने त्या दिवसांची आठवण काढत म्हटले की, आपल्या आयुष्यात लोकांचे पाठबळ होते, पण तरीही त्याला एकटेपणा वाटत होता. तेव्हा त्याला व्यावसायिक मदतीची आवश्यकता असल्याचे त्याने म्हटले. तो पुढे म्हणाला की, "वैयक्तिकरित्या, माझ्यासाठी नवीन खुलासा म्हणजे एका मोठ्या गटाचा भाग असूनही तुम्हाला एकटे वाटणे. मी असे म्हणू शकत नाही की माझ्याशी बोलण्यासारखे कोणी नाही परंतु मी काय बोलत आहे हे कोणाला समजू शकेल याबद्दल बोलण्यासाठी कोणताही व्यावसायिक नाही. मला वाटते की हे एक खूप मोठे कारण आहे. मला ते बदलताना पाहायचे आहे."
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक भारतीय कर्णधाराचा असा विश्वास आहे की मानसिक आरोग्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण यामुळे एखाद्या खेळाडूची कारकीर्द खराब होऊ शकते. कोहली म्हणाला, "असा माणूस असावा ज्याच्याकडे कधीही जाऊन कधीही सांगावे की मला असे वाटत आहे. मला झोप येत नाही. मला सकाळी उठण्याची इच्छा नाही. माझा स्वतःवर विश्वास नाही. मी काय करू." तो म्हणाला, "बऱ्याच लोकांना अधिक काळापर्यंत असे वाटते. यास महिने लागतात. हे संपूर्ण क्रिकेट हंगामात सुरू राहू शकते. लोक त्यावर मात करत नाहीत. मला सर्व प्रामाणिकपणाने व्यावसायिक मदतीची गरज वाटते."