Video: केसरीक विल्यम्स ने विराट कोहली ला पुन्हा चिडवले, 'किंग कोहली' ने षटकार मारल्यावर दिलेली रिअक्शन पाहून तुम्हीही म्हणाल Wohooooo

या मॅचमध्ये विराट आणिविल्यम्समध्ये पुन्हा एकदा बॅट आणि बॉलची लढत पाहायला मिळाली. पुन्हा विल्यम्सने कोहलीला पुन्हा छेडले पण त्यानंतर भारतीय कर्णधाराने त्याला सहसा सोडले नाही.

केसरीक विल्यम्स आणि विराट कोहली (Photo Credit: IANS/Instagram)

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी शतकारांच्या पावसाने हजेरी लावली पण यावेळी एक वेगळीच लढाई पाहायला मिळाली. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या आधारे भारताने (India) वेस्ट इंडिजला (West Indies) तिसर्‍या आणि अंतिम टी-20 सामन्यात 67 धावांनी पराभूत करून मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात सर्वांची नजर पुन्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि वेस्ट इंडीजचा गोलंदाज केसरिक विल्यम्स (Kesrick Williams) याच्यावर होती. सुरुवातीला केसरिकने विराटवर काही डॉट बॉल टाकले. पण एकदा लयीत आल्यानंतर विराटने त्याची क्लासच घेतली. सलामी फलंदाजांच्या जोरदार सुरुवातीनंतर कर्णधार कोहलीने पुढाकार घेऊन केवळ 29 चेंडूंत 4 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा फटकावल्या. पण या मॅचमध्ये विराट आणिविल्यम्समध्ये पुन्हा एकदा बॅट आणि बॉलची लढत पाहायला मिळाली. पुन्हा विल्यम्सने कोहलीला पुन्हा छेडले पण त्यानंतर भारतीय कर्णधाराने त्याला सहसा सोडले नाही. (IND vs WI 3rd T20I: रोहित शर्मा ने केली विराट कोहली ची बरोबरी, वर्षाखेरीस दोघे बनले टी-20 चे किंग, वाचा सविस्तर)

विल्यम्स 16 व्या षटकात गोलंदाजीची आला आणि त्याने त्याच्या 6 चेंडूत केवळ 3 धावा दिल्या. या दरम्यान त्याने विराटला चार चेंडू फेकले ज्याच्यावर विराट केवळ 2 धावा करू शकला. विल्यम्सने त्याच्या षटकात कोहलीकडे पाहून काही हावभाव केले ज्यानंतर भारतीय कर्णधाराने त्याला बॉल टाकायला सांगितले. यानंतर विल्यम्स 18 व्या षटकात गोलंदाजीला आल्यावर कोहली-केएल राहून दोनघेही त्याच्यावर तुटून पडले. या षटकात दोन्ही फलंदाजांनी 17 धावा काढल्या. 18 व्या षटकात राहुल आणि कोहली या दोघांनी केसरिकला दोन षटकार मारले पण त्याचा मारलेला षटकार मारून भारतीय कर्णधार खुद्दच चकित झाला. बीसीसीआयने इन्स्टाग्राम अकाऊंटवरही विराटच्या प्रतिक्रियेची एक क्लिप शेअर केली गेली आणि "वोहू- मी जिथे हिट करतो तिथे ते पहा" असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Wohooooo - Look where I Hit that one 😲😲👌🏻 #TeamIndia #INDvWI @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

विराटने विंडीजविरुद्ध दमदार फलंदाजी करत टी-20 कारकीर्दीतील 24 वे अर्धशतक झळकावले आणि विंडीजला विशाल लक्ष्य दिले. विराटने त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात जलद 21 चेंडूत अर्धशतक केले. दुसरीकडे, दोन्ही संघात आता 15 डिसेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif