Virat Kohli Record: विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा धावांचा पाऊस पडणार, यावेळी पाँटिंग-सेहवागचा विक्रम निशान्यावर
नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने तीन सामन्यांत दोन शतके झळकावली.
मुंबई: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) बुधवारपासून म्हणजेच 18 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ज्याचा पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने तीन सामन्यांत दोन शतके झळकावली. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अनेक विक्रम मोडले, आता तो न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) हाच फॉर्म कायम ठेवू इच्छितो. न्यूझीलंडविरुद्धही विराट कोहलीच्या अनेक विक्रमांवर नजर असेल. यामध्ये वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पाँटिंगचे रेकॉर्ड टार्गेटवर आहेत. (हे देखील वाचा: IND vs NZ ODI Head To Head: न्यूझीलंडशी टक्कर देण्यासाठी भारत सज्ज, वाचा वनडेत कोण आहे कोणावर भारी)
कोहलीने सचिनचा विक्रम मोडला
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत दोन शतकांच्या जोरावर 283 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने भारतीय भूमीवर 21वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याचवेळी कोहलीने श्रीलंकेविरुद्ध त्याचे 10 वे शतक झळकावत त्याच संघाविरुद्ध सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.
पाँटिंग-सेहवागचे विक्रम लक्ष्यावर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवायचा आहे. आत्तापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पाँटिंग संयुक्तपणे शीर्षस्थानी आहेत. या दोघांची किवी संघाविरुद्ध 6-6 शतके आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतके झळकावली तर तो पाँटिंग आणि सेहवागचे विक्रम मोडीत काढेल. यावेळी विराट कोहली कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध पाच शतके झळकावली आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 शतके
वीरेंद्र सेहवाग (भारत) - 23 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 शतके
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतके
विराट कोहली (भारत) - 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतके
सचिन तेंडुलकर (भारत) – 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतके