Virat Kohli टीम इंडियाचा अयशस्वी कर्णधार का आहे, माजी पाकिस्तानी क्रिकेटरने कारणे दाखवत केली टिका

कोहलीने कर्णधार म्हणून अद्याप एकही आयसीसी विजेतेपद जिंकलेले नाही हे नाकारता येत नाही, परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार दानिश कनेरिया याला वाटते की भारतीय फलंदाजी एकंदरीत ‘अयशस्वी कर्णधार’ आहे. यासाठी त्याने अनेक करणेही दिली आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

विराट कोहली (Virat Kohli) शून्य आयसीसी (ICC) विजेतेपदांसह खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून कार्यकाळ संपवण्याच्या तयारीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) सोबत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये कर्णधारपदाचा निरोप घेतल्यानंतर टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 हा देखील T20I मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा आहे. कोहलीने कर्णधार म्हणून अद्याप एकही आयसीसी विजेतेपद जिंकलेले नाही हे नाकारता येत नाही, परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार दानिश कनेरिया (Danish Kaneria) याला वाटते की भारतीय फलंदाजी एकंदरीत ‘अयशस्वी कर्णधार’ आहे. यासाठी त्याने अनेक करणेही दिली आहे. कोहलीच्या कर्णधारपदावर टीका होत आहे, अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या संघातील फलंदाजी क्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संघाच्या देहबोलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे आणि खुद्द कोहलीने हे मान्य केले आहे की खेळाडू किवींविरुद्ध पुरेसे धाडसी नव्हते. (Virat Kohli गेल्या 11 वर्षांपासून ‘या’ विक्रमासाठी तळमळतोय! यंदा T20 वर्ल्ड कपमध्ये होणार का स्वप्नपूर्ती?)

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताच्या निराशाजनक प्रदर्शनामागील कारणांची यादी करताना, कनेरिया म्हणाला की कोहलीचा कर्णधार त्याच्या यादीत नंबर 1 आहे. “त्याची बरीच कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे विराट कोहली - तो एक अयशस्वी कर्णधार आहे. त्याने WTC फायनलसाठी चुकीचा संघ निवडला. तो ऑस्ट्रेलियात असेपर्यंत भारताचा पराभव झाला आणि त्यानंतर अजिंक्य रहाणे कर्णधार झाला व त्याने संघाचे विजयी नेतृत्व केले. विराट कोहली हा मोठा खेळाडू आहे यात शंका नाही पण मी त्याच्यात कर्णधारपदाची क्षमता कधीच पाहिली नाही. त्याच्यात खूप आक्रमकता आहे पण कर्णधार म्हणून निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही,” पाकिस्तानचा माजी फिरकीपटू त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध T20I मालिकेदरम्यान कोहलीने भारतासाठी टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मासोबत सलामीची योजना उघड केली होती. पण या स्पर्धेत रोहित शर्मा आणि केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात सलामीला उतरले, तर रोहितला तिसऱ्या क्रमांकावर डिमोट केले आणि त्याच्या जागी ईशान किशनला अव्वल स्थानावर आणले. कनेरियाला असे वाटते की संघातील सर्वोत्तम संयोजनाबाबत कोहलीच्या विचारांमध्ये संघर्ष आहे. टी-20 विश्वचषक 2021 मधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या पराभवासाठी कनेरियाने विराट कोहलीला जबाबदार धरले. या दरम्यान भारताला पहिल्या साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून तर न्यूझीलंड विरोधात 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाच्या खराब कामगिरीला केवळ कोहलीच जबाबदार असल्याचे कनेरियाने म्हटले आहे.