Virat Kohli Described MS Dhoni As Selfless: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने शेअर केल्या महेंद्रसिंह धोनी सोबतच्या 'या' खास आठवणी; पाहा संपूर्ण व्हिडिओ

15 ऑगस्टला संध्याकाळी धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 15 ऑगस्टला संध्याकाळी धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारतीय संघातले धोनीचे चाहते त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भावूक झाल्याचे दिसत आहे. विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात धोनीसोबतच्या 2 खास आठवणी आहेत. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

टी-20 विश्वचषक 2014 मध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सेमीफाइनल सामना खेळला गेला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण अफ्रिकेच्या संघाने 20 षटकात भारतासमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराट कोहलीने केलेल्या दमदार खेळीमुळे भारताने दमदार विजय मिळवला होता. मात्र, सामना सुरु असताना भारताला 7 बॉलमध्ये 1 धावाची गरज होती. त्यावेळी विराट कोहलीला विजयी धाव करता यावी म्हणून स्ट्राईकवर असलेल्या महेंद्रसिंह धोनीने 19 षटकातील बुरहान हेंड्रिक्सचा शेवटचा बॉल प्लेड केला होता. तसेच टी-20 विश्वचषक 2016 मध्ये बांगलादेश विरोधातील सामन्यात कशाप्रकारे धोनीने एका धावाचे 2 धावांत रुपांतर केले, हे देखील या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. हे देखील वाचा- See You at Toss: '19 तारखेला टॉस दरम्यान भेटू' महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर भारताचा उप-कर्णधार रोहित शर्माचे अनोख ट्वीट

विराट कोहलीचे ट्वीट-

याआधीही विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या घोषणानंतर आपली भावना व्यक्त केली होती. दरम्यान, तो म्हणाला होता की, “प्रत्येक क्रिकेटपटूला आपली कारकिर्द एक ना एक दिवस थांबवावीच लागते. प्रवास एका दिवशी संपणार असतो. मात्र, एखादा असा व्यक्ती ज्याला तुम्ही खूप जवळून ओळखता तो व्यक्ती जेव्हा अशी निवृत्तीची घोषणा करतो तेव्हा मनात प्रचंड भावना दाटून येतात. तू देशासाठी जे योगदान दिलेय ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहिल”, असेही विराट कोहली म्हणाला आहे.



संबंधित बातम्या

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून