Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी अशी आहे, 'रन मशीन'च्या; आकडेवारीवर एक नजर
या कालावधीत विराट कोहलीने 29 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत.
Australia National Cricket Team vs India National Cricket Team, 5th Test Match: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला चौथा सामना सिडनी (Sydney) येथील सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) भारतीय वेळेनुसार पहाटे 5.00 वाजता खेळवला जाईल. चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. (हेही वाचा - ICC Women's Batting Rankings: आयसीसी महिला फलंदाजी क्रमवारीत हेली मॅथ्यूज टॉप 10 मध्ये, जेमिमाह रॉड्रिग्स आणि ऋचा घोष यांचीही मोठी झेप)
आता या मालिकेतील पाचवी कसोटी सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीत सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीवर असणार आहेत. सध्या विराट कोहलीचा फॉर्म काही खास नाही. अशा परिस्थितीत विराट कोहलीची आकडेवारी पाहू.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत विराट कोहलीची आकडेवारी
विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 29 कसोटी सामन्यांच्या 53 डावांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 47.48 च्या सरासरीने आणि 52.41 च्या स्ट्राइक रेटने 2209 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटची सर्वोत्तम धावसंख्या १८६ आहे. या काळात विराट कोहलीने नऊ शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर द्यायची असेल, तर विराटच्या फलंदाजीची कामगिरी महत्त्वाची आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
ऑस्ट्रेलियातील विराट कोहलीच्या कसोटीची आकडेवारी
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 17 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 54.08 च्या सरासरीने आणि 53.14 च्या स्ट्राईक रेटने 1519 धावा केल्या आहेत. या काळात विराटने चार अर्धशतकं आणि सात शतकं झळकावली आहेत.
बॉक्सिंग डे टेस्टमध्ये विराट कोहलीची कामगिरी अशी होती
विराट कोहलीने बॉक्सिंग-डे कसोटीत आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. या कालावधीत विराट कोहलीने 14 डावांमध्ये सुमारे 45 च्या सरासरीने 581 धावा केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीने 169 धावांसह एक शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. या काळात विराट कोहली 2 डावात खातेही न उघडता बाद झाला आहे. विराट कोहली या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटीत शेवटचा खेळला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने 36 आणि पाच धावा केल्या होत्या.
या मालिकेत विराट कोहलीची कामगिरी अशी आहे.
सध्याच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये विराट कोहली त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीने 4 सामन्यांच्या 5 डावात 31.50 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद 100 धावा केल्या, या दौऱ्यातील विराट कोहलीचे हे एकमेव शतक आहे. तेव्हापासून विराट कोहली सतत धावांसाठी तळमळत आहे. या मालिकेत विराट कोहलीने 5 धावा, 100 धावा नाबाद, 7 धावा, 11 धावा, 3 धावा, 36 धावा आणि 5 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
भारतीय फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 119 कसोटी सामन्यांच्या 203 डावांमध्ये 47.83 च्या उत्कृष्ट सरासरीने 9,081 धावा केल्या आहेत. या कालावधीत विराट कोहलीने 29 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर (15,921 धावा), राहुल द्रविड (13,265 धावा) आणि सुनील गावस्कर (10,122 धावा) नंतर विराट कोहली हा चौथा सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज आहे.