फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले हे आहेत '3' भारतीय क्रिकेटर्स!

आपल्या देशात क्रिकेटप्रेमींची काही कमतरता नाही. क्रिकेट न आवडणारी मंडळी काही मोजकीच असतील.

Indian Cricket Team (Photo: IANS)

आपल्या देशात क्रिकेटप्रेमींची काही कमतरता नाही. क्रिकेट न आवडणारी मंडळी काही मोजकीच असतील. त्यामुळे भारतीय क्रिकेटर्सवर भरभरुन प्रेम करणारे चाहतेही आहेत. हे चाहते केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही या क्रिकेटर्सवर प्रेम करतात. चाहत्यांचे हे प्रेम, स्नेह दाखवण्याचा आजकाल एक खास मार्ग आहे. ते म्हणजे सोशल मीडियावर फॉलो करणे. यामुळे क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याची खास माहिती चाहत्यांना मिळते. तसंच सोशल मीडियामुळे चाहत्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे, या किक्रेटर्संना सोपे होते. तर जाणून घेऊया सोशल मीडिया साईट फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय क्रिकेटर्स कोण आहेत...

विराट कोहली

फोलोअर्सच्या यादीत विराट कोहली अग्र स्थानी आहे. फेसबुकवर विराटचे सुमारे 37 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट कोहलीचा खेळ आणि कर्णधारपदाची धूरा यशस्वीपणे सांभाळत असल्याने अनेकांकडून विराटचे कौतुक होते. जगातील सर्वात उत्तम खेळाडूंपैकी एक विराट आहे. आतापर्यंतचा त्याचा खेळ आणि विक्रम पाहता त्याच्यात सचिनचे सर्व रेकॉर्ड्स तोडण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. एकदिवशीय सामन्यातील शतकांमध्ये विराट सचिनच्या 10 शतकंच मागे आहे. तर कसोटी सामन्यातील दुहेरी शतकात त्याने सचिनची बरोबरी केली आहे. लाखो-करोडो फॉलोअर्स असलेला विराट कोहली ट्विटरवर या '5' परदेशी क्रिकेटर्संना करतो फॉलो!

सचिन तेंडूलकर

या यादीत मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरचा दुसरा क्रमांक लागतो. सचिनचे फेसबुकवर तब्बल 28 मिलियन फॉलोअर्स आहेत. सचिन हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असून त्याच्या धावांनी त्याने अनेक विक्रम रचले आहेत. 463 एकदिवसीय सामन्यात सचिनने 18,426 धावा केल्या आहेत. तर 49 शतक, 96 अर्धशतक आणि एक दुहेरी शतक केले आहे. याशिवाय 200 कसोटी सामन्यात सचिनने 15,921 धावा केल्या असून त्यात 51 शतक, 6 दुहेरी शतकं आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शकत झळकवणारा सचिन हा जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

महेंद्रसिंग धोनी

माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीला फेसबुकवर सुमारे 20 मिलियन लोक फॉलो करतात. धोनी आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार होता, असे म्हटले जाते. अतितटीच्या काळातही टीमला न घाबरवता अतिशय शांतपणे कसे खेळवायचे, हे कसब माहीकडे होते आणि आहे. धोनीच्या कर्णधारपदाखाली आपण 28 वर्षांनंतर 2011 मध्ये वर्ल्डकपला गवसणी घातली. तर धोनीच्याच अधिपत्याखाली टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत चॅम्पियन बनला. याशिवाय धोनी कर्णधार असताना 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचे आपण मानकरी ठरलो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now