टीम इंडिया च्या व्हेरी व्हेरी स्पेशल फॅनसोबत साजरा केला रोहित शर्मा आणि विराट कोहली ने IND vs BAN मॅचमधील विजय, पाहून तुम्हीसुद्धा प्रफुल्लित व्हाल (View फोटो)
बांग्लादेश विरुद्ध मॅच संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सामनावीर रोहित शर्मा यांनी चारुलता पटेल, आजींची भेट घेतली आणि बांगलादेशविरुद्ध चा विजय साजरा केला.
आयसीसी (ICC) विश्वकपच्या बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध मॅचमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने सेमीफाइनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. भारताने 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता आणि 1 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. बांगलादेशविरुद्ध सामन्यात भारतानं 315 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया च्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशला केवळ 286 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, या सामन्यात भारताला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या एका आज्जीबाईंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चारुलता पटेल, या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारख्या चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. (ICC World Cup 2019: रोहित शर्मा ने मारलेला षटकाराचा चेंडू 'तिला' लागला; हिटमॅन ने ऑटोग्राफ कॅप देऊन केली भरपाई, पहा Photo)
सामन्यादरम्यान, या आजीबाईंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वैराळ झाले आणि टीम इंडिया च्या खेळाडू ही त्यांना भेटण्याचा मोहा आवृ शकले नाही. मॅच संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सामनावीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी या आजींची भेट घेतली आणि बांगलादेशविरुद्ध चा विजय साजरा केला.
दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध विजयासह भारताने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं आहे तर बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या. भारताचा पुढील सामना 6 जुलै ला श्रीलंका (Sri Lanka) शी होणार आहे. भारतीय संघाने यंदाच्या विश्वकपमध्ये 1 सामना गमावला आहे.