IPL Auction 2025 Live

Team India: धोनी-कोहलीने दुर्लक्ष केल्याने ‘या’ 4 स्टार भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीवर ब्रेक!

पण तुम्हाला माहित आहे का की या काळात विराट आणि धोनीने काही खेळाडूंकडे नेहमीच दुर्लक्ष केले, ज्यामुळे त्यांची कारकीर्द वेगळ्या पद्धतीने संपली.

एमएस धोनी, विराट कोहली (Photo Credit: Getty)

विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्र सिंह धोनीसारख्या कर्णधारांनी भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) ऐतिहासिक क्षण दिले आहेत. धोनी आणि कोहली यांनी भारतीय संघाचे (Indian Team) कर्णधारपद सांभाळले तेव्हा या दोघांसमोर अनेक मोठी आव्हाने होती, जसे की तरुणांना संधी देणे आणि भविष्यासाठी संघाची बांधणी करणे. पण तुम्हाला माहित आहे का की या काळात विराट आणि धोनीने काही खेळाडूंकडे नेहमीच दुर्लक्ष केले, ज्यामुळे त्यांची कारकीर्द वेगळ्या पद्धतीने संपली. अशा परिस्थितीत त्या 4 दुर्दैवी क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया. (IND vs SA 2022: टी-20 मालिकेत ‘हा’ स्टार खेळाडू भारतासाठी ठरेल ‘एक्स फॅक्टर’, 16 वर्षांचा अनुभव टीम इंडियासाठी बनेल फायदेशीर)

1. अंबाती रायुडू

इंग्लंडमध्ये 2019 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ विजयरथावर स्वार होत असताना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती घेतली. विश्वचषक 2019 साठी संघ निवडीच्या वेळी निवडकर्त्यांनी अंबाती रायुडूची राखीव खेळाडू म्हणून निवड केली होती. पण प्रथम शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले, त्यानंतर अष्टपैलू विजय शंकरला इंग्लंडला पाठवण्यात आले. अंबाती रायुडूला सलग दोन वेळा दुर्लक्षित करण्यात आले. मयंक अग्रवालला 2019 विश्वचषक स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी तो 15 सदस्यीय संघाचा भाग होता. विराट कोहलीने रायुडूकडे दुर्लक्ष केले कदाचित ही गोष्ट मनावर घेऊन त्याने निवृत्ती जाहीर केली.

2. अमित मिश्रा

एकेकाळी भारतीय संघात अमित मिश्राच्या नावाची बरीच चर्चा होती. मिश्रा खूप चांगली गोलंदाजी करत होता, पण तत्कालीन कर्णधार धोनीने त्याला ज्या संधी मिळायला हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. मिश्राने टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी केली. अमितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि 22 कसोटी सामन्यात 76 विकेट घेतल्या. त्याच वेळी, मिश्राने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत 36 वनडे सामन्यांत 4.73 च्या इकॉनॉमीसह 64 बळी घेतले. याशिवाय अमित मिश्राने 10 टी-20 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या, परंतु प्रकरण तिथेच अडकले की या खेळाडूचा समावेश दुर्दैवी खेळाडूंच्या यादीत झाला ज्यांना कर्णधारांनी पुरेशी संधी दिली नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या खेळाडूने शेवटच्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावला होता.

3. मनोज तिवारी

मनोज तिवारी हे नाव ऐकल्यावर तुम्हाला भोजपुरी स्टारची आठवला आली असेलच, पण भारतीय संघात या नावाच्या खेळाडूनेही चांगला खेळ दाखवला. मनोज तिवारी या स्टार नावाच्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियात प्रवेश केला होता. तिवारीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना मनोज तिवारी 26.09 च्या सरासरीने केवळ 287 धावा करू शकला, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 धावा होती. त्याचप्रमाणे तिवारीने 2011 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्याला 3 सामन्यानंतर वगळण्यात आले. त्यामुळे आजच्या युगात अशा युवा खेळाडूंमध्ये प्रतिभा भरलेले असताना या खेळाडूचे संघात पुनरागमन होणे अशक्य आहे.

4. वरुण आरोन

भारतीय संघाचा गोलंदाज वरुण आरोनची क्रिकेट कारकीर्दही संपण्याच्या मार्गावर आहे. वरुणने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत 63 सामन्यांमध्ये गोलंदाजी करत 167 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी पाहून निवड समितीने वरुणला टीम इंडियात प्रवेश दिला, मात्र कर्णधार धोनीने त्याला पुरेशी संधी दिली नाही. 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. वरुण आरोनने 9 कसोटी सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर आरोनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 9 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या. वरुणला 2015 साली भारतीय संघातून वगळण्यात आले होते आणि आजपर्यंत या खेळाडूला संधी मिळालेली नाही.