Virat Kohli New Recod IPL: आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने केला अप्रतिम विक्रम, ख्रिस गेलला मागे टाकून गाठले अव्वल स्थान
आयपीएलच्या इतिहासात त्याने आता ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे.
RCB vs GT: आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत विराट कोहलीने (Virat Kohli) सलग दुसरे शतक ठोकले आहे. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या (RCB vs GT) महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने 60 चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासात त्याने आता ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच दोन सामन्यांमध्ये सलग शतके ठोकणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला. (हे देखील वाचा: Virat Kohli & Faf-Du-Plessis New Record: विराट आणि फाफच्या जोडीने आयपीएलमध्ये इतिहास रचला, स्वतःचाच विक्रम मोडला)
विराट कोहलीपूर्वी आयपीएलच्या इतिहासात असे दोन खेळाडू आहेत ज्यांनी दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत. शिखर धवनने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी हे केले. तर 2022 मध्ये जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी हा पराक्रम केला होता. आता विराट असा तिसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमधील विराट कोहलाचे हे सातवे शतक होते आणि त्याने 6 शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले आहे. विराट कोहलीने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 101 धावा केल्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
विराट कोहली - 7
ख्रिस गेल - 6
जोस बटलर - 5
केएल राहुल - 4
डेव्हिड वॉर्नर -4
शेन वॉटसन - 4
आयपीएल 2023 मधील विराट कोहलीची कामगिरी
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 14 सामन्यांच्या 14 डावात 639 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 6 अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. तो या मोसमात फाफ डू प्लेसिस (730) नंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत तो दुसरा आला आहे. त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात १९७ धावा केल्या. या मोसमातील हे 10वे शतकही ठरले. त्याआधी आज कॅमेरून ग्रीननेही मुंबई इंडियन्सकडून नाबाद 100 धावा केल्या.