IPL Auction 2025 Live

Mohammad Yousuf On Virat Kohli: विराट कोहली याच्या उत्कृष्ट कामगिरीचे रहस्य काय? पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी सांगितले कारण

विराट कोहली हा जगभरातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यानंतर त्याचे नाव घेतले जाते.

Mohammad yousuf, Virat Kohli (Photo Credit: PTI, Facebook)

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार कामगिरीची जोरादार अनेकांची मन जिंकले आहेत. विराट कोहली हा जगभरातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यानंतर त्याचे नाव घेतले जाते. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) यांनी विराट कोहलीच्या उत्कृष्ट कामगिरीमागचे रहस्य सांगितले आहे. “ मी कोहलीला सराव करताना पाहिलेले नाही. ट्विटरवर त्याच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाहिले आहेत. आजच्या युगात जर कोणी मला आधुनिक क्रिकेट म्हणजे काय? असे विचारले तर, मी प्रशिक्षण असे उत्तर देतो. आताचे खेळाडू तंदुरूस्त आहेत. जसे की विराट कोहली आहे. हेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे रहस्य आहे.

युट्यूबच्या क्रिकास्ट कार्यक्रमात युसुफ म्हणाले की, विराटचे एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये एकूण 70 शतके आहेत. दरम्यान, एकदिवसीय सामन्यात त्याचे 12 हजार धावा आहेत. तर, कसोटी सामन्यात तो लवकरच 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता आहे. टी -20 क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे, असे युसूफ म्हणाले आहेत. हे देखील वाचा- भारतीय वंशाच्या मुलीच्या प्रेमात पाकिस्तानी क्रिकेटपटू येडापीसा, स्वत:चा देश सोडून 'हा' दिग्गज फिरकीपटू झाला दक्षिण आफ्रिकेचा नागरिक

तसेच, आजच्या युगात आजच्या युगात तो क्रमांक एकचा फलंदाज आहे. मी पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटूंची तुलना करणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. कोहलीची कामगिरी अविश्वसनीय आहे." युसूफने पाकिस्तानकडून 288 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9720 धावा केल्या आहेत. तर, 90 कसोटी सामन्यात 7530 धावा केल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे आयपीएलचा चौदावा हंगामा स्थगिती देण्यात आल्यानंतर विराट आता कोरोनाविरूद्ध फलंदाजी करताना दिसत आहे. दरम्यान, विराट आणि अनुष्का शर्माने कोरोनाविरोधात एका मोहिमेअंतर्गत केवळ 7 दिवसांत 11 कोटी 39 लाख 11 हजार 820 रुपयांचा निधी जमा केला आहे. विराट-अनुष्काने मोहिमेच्या सुरुवातीला 7 कोटींचे लक्ष्य ठेवले होते. कोरोना विरोधात हातभार लावणाऱ्या सर्वांचे विराटने आभार मानले आहेत.