Virat Kohli Gifts To David Warner’s Daughter: भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून डेव्हिड वॉर्नरच्या मुलीला खास भेट; पाहा फोटो
सर्वात मोठी इवी ही सहा वर्षांची आहे. त्यानंतर इंडी रे ही चार वर्षाची आहे. तर, तिसरी मुलगी इस्ला रोज ही एका वर्षाची आहे. परंतु, इंडी रे ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. तिला वडिलांपेक्षा विराट कोहलीची फलंदाजी अधिक आवडते. तसेच तिला विराट कोहलीसारखे बनायचे आहे, असेही तिचे स्वप्न आहे.
ऑस्ट्रेलियाला नुकतेच मायदेशात भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करत बॉर्डर-गावस्कर मालिका खिशात घातली आहे. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ निराश दिसत आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरची (David Warner) मुलगी इंडी रे (Indi Rae) आनंद साजरा करत आहे. याचे कारणही खूप खास आहे. इंडी रे ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) खूप मोठी चाहती आहे. पहिल्या सामना खेळून आपल्या मायदेशात परताना विराटने इंडी रे हिला एक खास गिफ्ट केले आहे. विराटकडून मिळालेले गिफ्ट पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
नुकताच डेव्हिड वार्नरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत वार्नरची मुलगी इंडी रे ही विराटची कसोटी जर्सी घातल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत वार्नर असे म्हणाला आहे की, 'मला माहित आहे की आम्ही मालिका गमावली. पण एक मुलगी आहे जी खूप खूश आहे. विराट कोहलीची प्लेइंग टेस्ट जर्सी घातल्यानंतर तिचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. इंडी ही तिचे वडील आणि आरोंन फिंच यांच्याशिवाय विराट कोहलीची मोठी चाहती आहे. हे देखील वाचा- IND vs ENG Test Series 2021: विराट कोहलीच्या रडारवर MS Dhoni याचे 3 मोठे रेकॉर्ड, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये करावे लागणार 'हे' काम
इंस्टाग्राम पोस्ट-
डेव्हिड वार्नरला तीन मुली आहेत. सर्वात मोठी इवी ही सहा वर्षांची आहे. त्यानंतर इंडी रे ही चार वर्षाची आहे. तर, तिसरी मुलगी इस्ला रोज ही एका वर्षाची आहे. परंतु, इंडी रे ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. तिला वडिलांपेक्षा विराट कोहलीची फलंदाजी अधिक आवडते. तसेच तिला विराट कोहलीसारखे बनायचे आहे, असेही तिचे स्वप्न आहे.