'त्याग विसरणार नाही...' हंदवाडा येथे लष्करच्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेल्यांना विराट कोहली, गौतम गंभीर यांनी वाहिली श्रद्धांजली
विराटने ट्विटरवर श्रद्धांजली वाहताना सांगितले की शहीदांचा बलिदान विसरला जाणार नाही. भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही हंदवाडा येथील शहीद सैनिकांना खरा नायक म्हणून संबोधले.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने रविवारी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा (Handwara) येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहेत. विराटने ट्विटरवर श्रद्धांजली वाहताना सांगितले की शहीदांचा बलिदान विसरला जाणार नाही. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 भारतीय सैनिक शहीद झाले. 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष वर्म, जम्मू-काश्मीर उपनिरीक्षकासह एकूण 5 सैनिक शाहिद झाले. कोहलीने ट्विट करून या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. कोहलीने लिहिले की, 'जे लोक कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य विसरत नाहीत, ते खरे नायक आहेत. त्यांचा त्याग कधीही विसरू नये. हंदवाडा येथील शहीद सैनिक व पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या शांतीची इच्छा करतो. जय हिंद.'' यासह भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही हंदवाडा येथील शहीद सैनिकांना खरा नायक म्हणून संबोधले. (Handwara हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट; शहीद कर्नल आशुतोष शर्मा, J&K पोलीस उपनिरीक्षक आणि जवानांना वाहिली श्रद्धांजली)
त्याने ट्विटरवर लिहिले, 'खरा नायक कोण आहे? अभिनेता, खेळाडू की नेता? फक्त सैनिकच खरा नायक नसतो. कायमचा. त्या शूर सैनिकांच्या पालकांना सलाम." हंदवाडा येथील नागरिकांच्या घरात दहशतवाद्यांनी लोकांना ओलिस ठेवले होते, त्यांना वाचवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी आले होते. या चकमकीत पाच सुरक्षा कर्मचारी शहीद झाले पण घरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी 2 दहशतवादीही ठार झाले.
विराट कोहलीचे ट्विट
गौतम गंभीरचे ट्विट
सुरेश रैना यानेही ट्विट करून दुःख व्यक्त केले. रैनाने म्हटले, "आम्ही आमच्या पाच सैनिकांना गमावले, हे ऐकून फार वाईट वाटले. हे आपल्या देशाचे एक मोठे नुकसान आहे. आमचे सैनिक आमचे रक्षण करताना सीमेवर अशा परिस्थितीचा सामना करत आहेत हे फार वाईट आहे. त्यांच्या बलिदानासाठी शहीदांना माझा अभिवादन आणि कुटुंबीयांबद्दलसाठी संवेदना."
शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचार्यांमध्ये सैन्य अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे मेजर अनुज आणि उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू काश्मीर पोलिस उपनिरीक्षक शकील काझी ही शाहिद झाले.