IND vs AUS, Perth Test: विराट कोहली पुन्हा फ्लॉप, 7 वर्षात पहिल्यांदाच पाहावा लागला इतका लाजिरवाणा दिवस

पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा करून तो बाहेर पडला. या मालिकेत कोहली पुनरागमन करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.

Virat Kohli (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा करून तो बाहेर पडला. या मालिकेत कोहली पुनरागमन करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. जोश हेजलवूडने त्याला पहिल्या डावात आपला बळी बनवले. आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहली कसोटीत सलग पाच डावात 20 धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरला आहे. शेवटच्या 5 डावांमध्ये त्याचा स्कोअर 5, 1, 4, 17 आणि 1 आहे. 7 वर्षात पहिल्यांदाच असे घडले की, विराटला सलग 5 कसोटी डावात 20 धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

हेझलवूडने केली शिकार

2 विकेट पडल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. जोश हेझलवूडच्या शॉर्ट पिच चेंडूवर तो झेलबाद झाला. हेझलवूडचा हा चेंडू अधिक उसळी घेऊन बॅटला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाने चांगला झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. (हे देखील वाचा: KL Rahul Out or Not Out: केएल राहुलसोबत झाली चीटिंग? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पर्थ कसोटीत चर्चेला उधाण)

हेझलवूडने 10व्यांदा विराट कोहलीला केले बाद

जोश हेजलवूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला दहाव्यांदा बळी बनवले आहे. अशी कामगिरी करणारा तो संयुक्तपणे दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांनीही प्रत्येकी 10 वेळा कोहलीला बाद केले आहे.

विराट कोहलीला सर्वाधिक बाद करणारे गोलंदाज

11 - टिम साउथी

10 - जोश हेझलवुड*

10 - जेम्स अँडरसन

10 - मोईन अली

Tags

AUS vs IND Australia Men's cricket team Australia vs India BCCI Board of Control for Cricket in India Border-Gavaskar trophy Border-Gavaskar Trophy 2024-25 India squad For Australia Tour India national cricket team Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team Jasprit Bumrah KL Rahul Perth Perth Stadium Rohit Sharma Sydney Sydney Cricket Ground Team India Team India vs Australia Test Series Virat Kohli WTC Final India National Cricket Team Vs Australia Men's cricket team match Scorecard ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ केएल राहुल जसप्रीत बुमराह टीम इंडिया टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका डब्ल्यूटीसी फायनल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड IND vs AUS Perth Test