Photos: विराट कोहली नवीन Audi कार ड्राइव करून पोहचला मुंबई एयरपोर्टवर, पहा फोटो
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकताच मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाला. यादरम्यान विराट त्याची नवीन एसयूव्ही ऑडी क्यू 8 कार स्वतः चालवून एयरपोर्टवर पोहचला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात पराभवाला सामोरे गेल्यावर भारतीय संघ (Indian Team) आता दुसऱ्या सामन्यासाठी राजकोटसाठी रवाना झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नुकताच मुंबई एयरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट झाला. यादरम्यान विराट त्याची नवीन ऑडी कार स्वतः चालवून एयरपोर्टवर पोहचला. जर्मनीची सुप्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही ऑडी क्यू 8 (Audi Q8) काल मुंबईत लाँच केली आणि कोहली या लक्झरी एसयूव्हीचा पहिला मालक बनला. बघण्यामध्ये ही गाडी अत्यानंद स्टायलिश आहे. विराटचे एयरपोर्टवरील फोटोज सोशल मेडियावर येताच व्हायरल झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाकडे ही अखेरची संधी असेल. राजकोटमधील सामन्यात पराभव झाल्यास भारताला मालिकाही गमवावी लागेल. (Video: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात विकेट न मिळाल्याने हताश विराट कोहली याने अंपायरसह घातला वाद)
दरम्यान, विराटच्या या नवीन गाडीबद्दल बोलले तर, कोहलीने टॅन इंटीरियरसह समोरच्या भागात मसाजच्या सीट्सदेखील बसवल्या आहेत. पाहा हे फोटोज:
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया मालिकेत 0-1 मागे आहे, जर दुसरा सामना भारत जिंकला नाही तर मालिका गमवून बसतील. टीम इंडियाचा संपूर्ण गेम प्लॅन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अपयशी ठरला होता आणि ऑस्ट्रेलियाने शानदार विजय नोंदविला होता. नवीन वर्षातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला 10 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. लज्जास्पद पराभवानंतर संघाचे मनोबल थोडेसे घसरले असेल, शिवाय न्यूझीलंड दौऱ्याआधी फॉर्ममध्ये येणे भारतीय संघासाठी गरजेचे आहे.