Virat Kohli Century: विराट कोहलीने आपले 71 वे शतक 'या' दोन खास व्यक्तीनां केले समर्पित, ऐतिहासिक खेळीनंतर दिले हे वक्तव्य

मी काही महिन्यांत 34 वर्षांचा होणार आहे. संघाचे वातावरण खुलले आहे आणि संघाची मदत झाली आहे.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 1020 दिवसांनंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. त्याने आधीच 70 शतके ठोकली असली तरी 70 ते 71 वे आंतरराष्ट्रीय शतक यामध्ये 1020 दिवसांचे अंतर होते. त्याने हे अंतर भरून काढले आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर 4 सामन्यात 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान (AFG) विरुद्ध त्याने ऐतिहासिक शतक झळकावले. हे शतक त्याने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका कोहलीला समर्पित केले आहे. आशिया चषक 2022 च्या अधिकृत प्रसारकांशी बोलताना विराट कोहली म्हणाला, "गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवले आहे. मी काही महिन्यांत 34 वर्षांचा होणार आहे. संघाचे वातावरण खुलले आहे आणि संघाची मदत झाली आहे.

मला माहित आहे की बाहेर खूप बोलणे चालू आहे. मी माझ्या अंगठीचे चुंबन घेतले. तुम्ही मला येथे उभे असलेले पाहिले कारण एक व्यक्ती आहे ज्याने माझ्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. ती अनुष्का आहे. हे शतक तिच्यासाठी आहे आणि आमची मुलगी वामिकासाठी देखील आहे." (हे देखील वाचा: Virat Kohli ने T20I क्रिकेटमध्ये षटकारांचे ठोकले शतक, अशी कामगिरी करणारा ठरला तो दुसरा भारतीय खेळाडू)

तो पुढे म्हणाला, "जेव्हा तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असते जी गोष्टी दृष्टीकोनातून ठेवण्याबद्दल बोलत असते, जसे की अनुष्का होती, ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा मी परत आलो तेव्हा मी निराश झालो नाही. सहा आठवड्यांची सुट्टी. त्यानंतर मी ताजेतवाने झालो. परंतु या विश्रांतीमुळे मला पुन्हा खेळाचा आनंद घेता आला."