Virat Kohli याने आपल्या ट्विटरच्या बायोमधून ‘भारतीय क्रिकेटपटू’ शब्द हटवला, कारण जाणून तुम्हीही वाटेल कौतुक

आणि आता मुलीच्या जन्माच्या काही दिवसानंतर विराटने आपल्या ट्विटरवरील बायो म्हणजेच आपल्या बद्दल देण्यात येणाऱ्या माहितीत बदल केल्याचं समोर आलं आहे. विराटने आपल्या ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये केलेली बदल खरचं कौतुकास्पद आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Instagram)

Virat Kohli Twitter Bio: विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने 11 जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. विराटने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आणि आता मुलीच्या जन्माच्या काही दिवसानंतर विराटने आपल्या ट्विटरवरील बायो म्हणजेच आपल्या बद्दल देण्यात येणाऱ्या माहितीत बदल केल्याचं समोर आलं आहे. विराटने आपल्या ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये केलेली बदल खरचं कौतुकास्पद आहे. विराटने आपल्या ट्विटरवर त्याचा बायो (Virat Twitter Bio) अपडेट केला जिथे त्याने स्वतःला अभिमानी नवरा आणि वडील लिहिले. कोहलीचा हा जेस्चर सोशल मीडियावर यूजर्सनाही खूप पसंत पडत आहे. विशेष म्हणजे, विराट आपली पत्नी आणि मुलीबद्दल खूप सतर्क असल्याचं दिसत आहे. मुलीच्या जन्मानंतर विराट-अनुष्काने मीडिया फोटोग्राफर्सना आपल्या चुमुकलीचे फोटो न काढण्याची विनंती केली होती. (IND vs AUS 4th Test 2021: तुला परत मानलं ठाकूर! शार्दूल ठाकूरच्या गब्बा टेस्टमधील निर्णायक खेळीचं विराट कोहलीने मराठमोळ्या अंदाजात कौतुक, पहा Tweet)

आपल्या घरी चुमुकलीचं आगमन झाल्याचं विराटने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जाहीर केलं होतं. ‘कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली’, अशा शब्दात विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत असताना विराट पितृत्व रजेवर आहे. अ‍ॅडिलेड येथील पिंक-बॉल टेस्ट सामना खेळावर विराट मायदेशी परतला होता. त्यानंतरही विराट ऑस्ट्रेलियामधील संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होता. मेलबर्नमधील विजय असो किंवा सिडनी टेस्टदरम्यान मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहवर करण्यात आलेल्या वर्णद्वेशी टिप्पणीवर विराटने उघडपणे ट्विटर करत मत व्यक्त केले आहे. पहा विराट कोहलीच्या नवीन ट्विटर बायोची झलक.

विराट कोहलीचा नवीन ट्विटर बायो (Photo Credit: Twitter)

दरम्यान, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला की इंग्लंड संघ भारतात येणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतून विराट संघात पुनरागमन करेल अशी माहिती देण्यात आली आहे.