Virat Kohli ने ‘त्या’ विवादावर दिले स्पष्टीकरण, म्हणाला- ‘मी कधीच असा दावा केला नाही’
आपल्या डाएटबाबत सोशल मीडियावर टीकेचा सामना करणार्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. कोहली म्हणतो की त्याने कधीही शाकाहारी असल्याचा दावा केला नाही. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्याच्या आपल्या डायट वरील प्रश्नावर दिलेल्या विराटच्या उत्तराने सोशल मीडियावर विवादाला सुरुवात झाली.
आपल्या डाएटबाबत सोशल मीडियावर टीकेचा सामना करणार्या टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. कोहली म्हणतो की त्याने कधीही शाकाहारी (Vegetarian) असल्याचा दावा केला नाही. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्याच्या आपल्या डायट वरील प्रश्नावर दिलेल्या विराटच्या उत्तराने सोशल मीडियावर विवादाला सुरुवात झाली. विराटला एका इंस्टाग्राम यूजरने त्याच्या डायटबद्दल विचारले ज्याच्यावर ‘रनमशीन’ने लिहिले की, “भरपूर भाज्या, काही अंडी, 2 कप कॉफी, डाळ, Quinoa आणि भरपूर पालक. मलाही डोसा आवडतो. पण सर्व नियंत्रित प्रमाणात,” असे विराटने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हटले. त्याची पत्नी अनुष्का शर्मा एक शाकाहारी असून स्वत: कोहलीनेही कबूल केले होते की आयुष्यात या आहार परिवर्तनामागे तिची मुख्य भूमिका आहे. (Virat Kohli's Diet Plan: विराट कोहलीने उघडले आपल्या फिटनेसचे रहस्य, Gym व्यतिरिक्त खाण्यात असतो ‘या’ 7 गोष्टींचा समावेश)
यानंतर, काही यूजर्स त्याच्या निरोगी आहाराचे कौतुक करीत असताना, तेथे अंड्यांचा उल्लेख पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले. विराट कोहलीने जुन्या व्हिडिओमध्ये तो Vegan बनल्याचे नमूद केले होते (जे लोक आपल्या आहारात मांस व दुग्धजन्य पदार्थ वापरत नाहीत). आपल्या या प्रतिक्रियेवर वाद वाढत असल्याचे पाहून कोहलीने मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले, “मी कधीही Vegan असल्याचा दावा केलेला नाही. मी नेहमीच म्हटले आहे की मी शाकाहारी आहे. त्यामुळे दीर्घ श्वास घ्या आणि शाकाहारी पदार्थ खा (तुम्हाला हवे असल्यास).” दरम्यान, विराट सध्या मुंबईत क्वारंटाईन आहे. टीम इंडिया बुधवारी इंग्लंड दौर्यावर रवाना होईल, जिथे त्यांना 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फिनलं सामन्याचा देखील समावेश आहे.
दुसरीकडे, मागील वर्षी इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनशी इन्स्टाग्राम चॅट दरम्यान कोहलीनेही या बदलामागील काही 'आरोग्याच्या कारणांचा' उल्लेख केला होता. “मला मानेच्या मणक्याचे समस्या होते ज्यामुळे माझ्या छोट्या बोटाला दुखापत झाली आणि त्यामुळे फलंदाजी करणे मला कठीण झाले. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सेंच्युरियन कसोटीच्या आसपास हा प्रकार घडला होता. शिवाय, माझे पोट थोडे अम्लीय झाले, माझ्या मूत्रात ऍसिड जास्त झाले आणि माझ्या पोटाने हाडांमधून कॅल्शियम खेचण्यास सुरवात केली ज्यामुळे मणक्याचे प्रश्न उद्भवू लागले. त्यामुळे मला मांस करावे लागले आणि आता मला पूर्वीपेक्षा चांगले वाटते,” असे कोहली म्हणाला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)