Virat Kohli Brand Value Drops: कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ‘विराट’ घसरण; हजार कोटींचं नुकसान होऊनही बनला Most Valued Celebrity, वाचा सविस्तर

भारताचा माजी क्रिकेट कर्णधार Virat Kohli ने 2021 मध्ये सर्वाधिक मूल्यवान सेलिब्रिटी म्हणून आपले स्थान कायम ठेवले असूनही त्याचे ब्रँड व्हॅल्यू तब्ब्ल 22 टक्क्यांनी घसरली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा $32.2 लाख ब्रँड व्हॅल्यूसह 13 व्या क्रमांकावर तर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर व्हॅल्यूसह 11 व्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

Virat Kohli Brand Value: डफ आणि फेल्प्सने प्रसिद्ध केलेल्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन (Celebrity Brand Valuation) रिपोर्ट 2021 नुसार भारताचा माजी क्रिकेट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli_ याने 2021 मध्ये सर्वाधिक मूल्यवान सेलिब्रिटी (Most Valuable Celebrity) म्हणून आपले स्थान कायम ठेवले असूनही त्याचे ब्रँड मूल्य सुमारे 22 टक्क्यांनी घसरली आहे. सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन अहवालाच्या ताज्या आवृत्तीत असे म्हटले आहे की, कोहलीने या यादीत भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावल्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. विराट अलीकडेच खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधार पदावरून पायउतार झाला. कोहलीने गेल्या वर्षी 2021 मध्ये ब्रँड व्हॅल्यूचा पाचवा क्रमांक गमावला आहे. कन्सल्टन्सी फर्म डफ अँड फेल्प्सच्या अहवालानुसार 2020 मध्ये कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 2377 अमेरिकी लाख म्हणजे तब्ब्ल 1806.61 कोटी होती, परंतु 2021 मध्ये ही ब्रँड व्हॅल्यू $ 185.7 लाख, भारतीय रूपात 1,400 कोटींवर घसरली आहे.

माजी कर्णधार विराट कोहलीने $400 लाख ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी घसरण होऊनही $185.7 लाख ब्रँड व्हॅल्यूसह, एंडोर्समेंटमधून कमाईच्या बाबतीत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे. विराटच्या खराब खेळाचा परिणाम त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर दिसून आला आहे. गेल्या दोन वर्षांत विराटने एकही शतक झळकलेले नाही. दरम्यान या यादीत भारतीय संघाच्या माजी कर्णधारानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा USD 32.2 लाख ब्रँड मूल्यासह 13 व्या क्रमांकावर आहे तर भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर USD 47.4 लाख मूल्यासह 11 व्या स्थानावर आहे. तसेच भारताचा आणखी एक माजी कर्णधार एमएस धोनी 2021 मध्ये पाचव्या क्रमांकावर असून त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 69 टक्क्यांनी वाढ झाली असून ती $61.2 लाख झाली आहे. (IPL 2022: माजी RCB दिग्गज AB de Villiers याची मोठी भविष्यवाणी, सांगितले या मोसमात विराट कोहली किती धावा करणार?)

दरम्यान, प्रख्यात बॉलीवूड सेलिब्रिटी टोपलं-20 सेलिब्रिटी ब्रँडच्या यादीत वैशिष्ट्यीकृत करत असताना या वर्षी काही लक्षणीय बदल पाहायला मिळाले आहे. रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि एमएस धोनी यांनी त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये चांगली वाढ झाली आणि 2021 मध्ये ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि पीव्ही सिंधू यांच्यासारख्या खेळाडूंसह या अव्वल सेलिब्रिटी रँकिंगमध्ये आणखी खेळाडू वाढताना दिसत आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची कमाई कमी झालेली नाही. धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं होतं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now