IPL 2022: माजी RCB दिग्गज AB de Villiers याची मोठी भविष्यवाणी, सांगितले या मोसमात विराट कोहली किती धावा करणार?
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: IANS)

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्या धडाकेबाज सुरुवातीनंतर बुधवारी त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध होईल. या सामन्यात आरसीबीचा (RCB) धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणखी एक विक्रम आपल्या नावे शकतो. कोहली सध्या 130.02 च्या स्ट्राइक रेटने 200 डावात 6324 धावा करत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आणि दक्षिण आफ्रिका व आरसीबीचा (माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) कोहलीपासून हंगामीदार खेळीची अपेक्षा करत आहे. डिव्हिलिअर्सने म्हटले की माजी आरसीबी कर्णधार लीगच्या 15 व्या आवृत्तीत 600 हून अधिक धावा करेल. विशेष म्हणजे, कोहलीने पंजाब किंग्स विरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात 29 चेंडूंत नाबाद 41 धावा केल्या. (IPL मध्ये ‘या’ संघाकडून झळकावली गेली सर्वाधिक शतके, तर गेल्या 13 हंगामापासून KKR शतकासाठी आसुसला)

“फाफ डु प्लेसिस कर्णधार म्हणून येणार हे सर्वांनाच माहीत आहे. मला वाटते की विराट कर्णधार नसणे आणि थोडेसे दडपण सोडणे, खरोखरच बाहेर जाणे आणि मुक्त होणे ही माझ्यासाठी सर्वात रोमांचक गोष्ट आहे. मला विराटकडून खूप मोठ्या मोसमाची अपेक्षा आहे. या वर्षी त्याच्याकडून 600 पेक्षा अधिक धावा करण्याची मला अपेक्षा आहे,” 'VUSport स्ट्रीमिंग' या यूट्यूब चॅनलवर डिव्हिलियर्स म्हणाल. दरम्यान, आयपीएल 2016 कोहलीचा सर्वोत्तम हंगाम होता. RCB च्या माजी कर्णधाराने 16 डावात 152 च्या अधिक प्रभावी स्ट्राईक रेटने 973 धावा चोपल्या होत्या. विराटने त्या मोसमात चार शतके ठोकली. यापूर्वी फक्त ख्रिस गेल याने आयपीएल 2011 मध्ये दोन शतके ठोकली होती.

डीव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आरसीबीला या हंगामात डिव्हिलियर्सची उणीव भासत आहे. तथापि फ्रँचायझीने फाफ डु प्लेसिसची निवड करून आघाडीवर त्याचे रिक्त स्थान भरण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला कर्णधार म्हणूनही नियुक्त केले आहे. दरम्यान, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा करूनही पंजाबकडून सलामीचा सामना गमावला. तथापि ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड लवकरच संघात सामील होण्याची अपेक्षा असल्याने, हंगाम जसजसा पुढे जाईल तसतसे संघात सुधारणा होईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.