Virat Kohli Birthday Special: अनुष्का शर्मा हिला पहिल्यांदा पाहून नर्वस झाला होता विराट कोहली, जाणून घ्या विरुष्काच्या नात्यामधील काही खास गोष्टी
लग्नापूर्वी विराट आणि अनुष्का या दोघांनी एकमेकांना चार वर्ष डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले गेले.
बी टाउन आणि क्रिकेट मधील सुपरडुपर कपल बाबत बोलायचे झाल्यास सर्वात प्रथम विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचे नाव घेतले जाते. लग्नापूर्वी विराट आणि अनुष्का या दोघांनी एकमेकांना चार वर्ष डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले गेले. तर एका मुलाखतीत विराट याने अनुष्का बाबत पहिल्या वेळेस भेटण्यासाठी गेला असतानाचा किस्सा शेअर केला होता.जाहिरातीनंतर विराट आणि अनुष्का यांच्यामध्ये भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. तर अनुष्काने ही एका मुलाखतीत तिने असे सांगितले की, विराट कोहली सोबत डिनरसाठी बोलावले होते. तर डिनर हे पार्टीसाठी नव्हे तर नव्या घरासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतरअनुष्का आणि विराट यांच्यामध्ये नातेसंबंधिक अधिक मजबूत होण्यास सुरुवात झाली.
विराट कोहली याने टीव्ही होस्ट ग्राहम बेनसिंगर यांच्या चॅट शो साठी गेला असता त्यावेळी अनुष्का सोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा अधिक खुलून सांगितला. विराटने हा किस्सा सांगताना असे म्हटले की, आम्ही दोघे एका कंपनीच्या शॅम्पू जाहिरातीसाठी एकत्र भेटलो होतो. तेव्हा मला अभिनयाबाबत काहीच माहिती नव्हते. तेथेच माझ्या समोर अनुष्का होती. त्याचदरम्यान मी अनुष्काच्या समोर एक जोक ऐकवला. कारण मला त्या क्षणाची फार भीती वाटत होती आणि ते मला दाखवून द्यायचे नव्हते. पण त्या जोकनंतर अनुष्का विराट कोहलीला पाहून नि:शब्द झाली होती.
तसेच अवघ्या 29 व्या वर्षात अनुष्का हिने विराट सोबत आपले पुढील आयुष्य घालवायचा निर्णय घेत त्याच्या सोबत डिसेंबर 2017 मध्ये विवाह केला. मात्र लग्नाच्या दीड वर्षानंतर अनुष्काने 29 व्या वयात विराट सोबत का लग्न केले याचा खुलासा केला. त्यावेळी अनुष्काने असे म्हटले की, मला विराट कोहली अगदी मनापासून आवडायला लागला होता. त्यामुळेच लग्न अशी एक गोष्ट आहे जी आमच्या नात्याला पुढे घेऊन जाऊ शकते. तसेच मी नेहमी महिलांना समान अधिकार मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही तिने सांगितले होते. विरुष्का यांनी 11 डिसेंबरला इटली मध्ये मोठ्या धुमधामात लग्नसोहळा साजरा केला. तसेच दोघांनी लग्नानंतर काही ग्रॅन्ड रिसेप्शन ठेवले होते. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांपासून ते राजकीय नेते मंडळींनी सुद्धा उपस्थिती लावली होती.(विराट कोहली याने शेअर केला पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा Hot फोटो, चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया)
अनुष्का बऱ्याच वेळा विराट सोबत त्याच्या क्रिकेट दौऱ्यासाठी सुद्धा उपस्थिती लावताना दिसून येते. स्टेडिअमवर एका बाजूला त्याच्या चाहत्यांचे प्रेम आणि दुसऱ्या बाजूला अनुष्का हिचा विराट कोहली खेळत असतानाचा उत्साह पाहण्यासारखा असतो. यापूर्वी अनुष्का शर्मा विराट सोबत वर्ल्ड कप मध्ये सुद्धा सहभागी होत त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना दिसून आली होती. तर 5 नोव्हेंबरला विराट कोहली याचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यातील व्यक्ती खुपच हटके आणि खास वैशिष्ट असल्याचे मानले जाते.