MS Dhoni Legacy: 'त्याच्या सारखा कुणीही नसेल,' एमएस धोनीच्या अविश्वसनीय वारशाबद्दल विराट कोहली, बेन स्टोक्सकडून कौतुक (Watch Video)
धोनीने आज 39 वर्षे पूर्ण करून वयाच्या 40 व्या वर्षात पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने देखील त्याला शुभेच्छा दिल्या. आयसीसीने धोनीच्या वाढदिवसानिमित्त एका व्हिडिओही शेअर केला ज्यात विराट कोहली, बेन स्टोक्स, जोस बटलरसारख्या खेळाडूंनी धोनीचे कौतुक केले.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा आज वाढदिवस. धोनीने आज 39 वर्षे पूर्ण करून वयाच्या 40 व्या वर्षात पदार्पण केले. 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध धोनीने भारताकडून (India) उपांत्य सामना खेळला. त्या पराभवानंतर धोनीने खेळातून काही काळ विश्रांती जाहीर केली असून त्याला पुन्हा अद्याप संघातून खेळायची संधी मिळालेली नाही. धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करेल अशी चर्चा गेले अनेक महिन्यांपासून होत आहे, पण धोनी अजूनही क्रिकेट खेळण्यास सक्षम आहे असे त्याची पत्नी साक्षी आणि चाहते दोघेही सांगत आहेत. धोनी आता एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असला, तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मात्र अजिबात घट झालेली नाही. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) देखील त्याला शुभेच्छा दिल्या. आयसीसीने धोनीच्या वाढदिवसानिमित्त एका व्हिडिओही शेअर केला ज्यात विराट कोहली, बेन स्टोक्स, जोस बटलरसारख्या खेळाडूंनी धोनीचे कौतुक केले. (सोशल डिस्टंन्सिंगचा महत्त्वपूर्ण संदेश देत मुंबई पोलिसांनी एमएस धोनीला दिल्या वाढदिवसाच्या 'हटके' शुभेच्छा, पाहा Tweet)
क्रिकेट विश्वात धोनी त्याच्या फिल्डिंग, मॅच विनिंग फलंदाजी आणि मैदानावरील शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या जलद विकेटकिपिंगने फक्त चाहत्यांनाच नाही तर खेळाडूंनाही भुरळ पाडली आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना टीम इंडियामध्ये धोनीसोबत खेळण्याची संधी मिळाली. मैदानावर खेळाडूंना शंका असल्यास ते धोनीकडे मदत मागतात.
पाहा आयसीसीचा हा व्हिडिओ:
MS Dhoni Birthday Special: धोनी ने घेतलेले सर्वात धाडसी निर्णय ज्यांनी सगळ्यांनाच आश्चर्य चकीत केले - Watch Video
2019 भारत-इंग्लंड वर्ल्ड कप सामन्यानंतर धोनीवर टीकेची झोड उठली होती. संथ खेळीमुळे चाहतेही धोनीवर नाराज असल्याचे दिसू आले, तर त्यापैकी अनेकांनी धोनीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘निवृत्ती घे’ असा सल्ला दिला होता. मात्र, या सर्वांकडे लक्ष न देता धोनी आयपीएलमधून पुनरागमन करण्यास सज्ज होता. मात्र, भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आली. मार्च 28 पासून आयपीएलची सुरुवात होणार होती.