ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचमध्ये अंपायरशी हुज्जत विराट कोहली ला पाडणार महागात, सामनाबंदीची होऊ शकते कारवाई

मात्र, आत कोहलीला अंपायरशी खटपट करणे महागात पडू शकते.

(Photo by Alex Davidson/Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वकपमधील भारत (India)-बांगलादेश (Bangladesh) सामन्यात अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला पुन्हा एकदा राग अनावर झाला आणि जाऊन अंपायरशी भिडला. बांग्लादेशी फलंदाज सौम्या सरकार (Soumya Sarkar) चे पायचितचे अपिल अंपायरने फेटाळून लावल्यानंतर भारताने डीआरएस घेतला होता. त्यावेळी थर्ड अंपायर ने देखील फलंदाजाला नाबाद ठरवल. यानंतर कोहलीने अंपायरशी चर्चा केली. दरम्यान, याबद्दल सोशल मिडियावर देखील थर्ड अंपायर अलीम दार (Aleem Dar) यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (टीम इंडिया च्या व्हेरी व्हेरी स्पेशल फॅनसोबत साजरा केला रोहित शर्मा आणि विराट कोहली ने IND vs BAN मॅचमधील विजय, पाहून तुम्हीसुद्धा प्रफुल्लित व्हाल View फोटो)

मात्र, आत कोहलीला अंपायरशी खटपट करणे महागात पडू शकते. अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धही कोहलीने अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. पण तेव्हा त्याला दंड सुनावून जाऊ दिले होते. दंडासह कोहलीला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला होता. आणि आता आणखी एक पॉइंट त्याला एका विश्वकप सामन्यातून बाहेर करू शकतो.

मंगळवारी झालेल्या भारत-बांग्लादेश सामन्यात 12 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) च्या गोलंदाजीवर सौम्याच्या पॅडवर चेंडू लागला होता. यावर भारताने केलेलं अपील अंपायरने फेटाळून लावले. त्यावेळी कोलहीने शमीसोबत चर्चा करून डीआरएस घेतला. पण रिप्लेमध्ये चेंडू पॅडला लागला की बॅटला ते स्पष्ट झालं नाही. डीआरएस सफल न झाल्यास कोहलीने ग्राउंड अंपायरला जाऊन आपलं मत प्रदर्शित केले. त्यावेळी बराच वेळ कोहली अंपायरसोबत चर्चा करत होता.

आयसीसी च्या नियमानुसार अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणं किंवा कोणताही विवाद करणे हा आचारसंहितेचा भंग समजला जातो. त्यामुळे यावर कारवाई केली जाऊ शकते.