Virat Kohli-Anushka Sharma: विराट कोहली की अनुष्का शर्मा, कोण कोणाला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखतो, इंस्टाग्राम स्पर्धेदरम्यान पॉवर कपलने दिली मजेदार उत्तरं (Watch Video)

दोघांपैकी कोण व्यक्ती कोणाला चांगल्या प्रकारे हे सिद्ध करण्यासाठी बॉलीवूड-क्रिकेटच्या पॉवर कपलने मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली. इन्स्टाग्रामने त्यांच्या अधिकृत हँडलवर व्हिडिओ सामायिक केला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Instagram)

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी इन्स्टाग्रामच्या #टेकब्रेक व्हिडिओमध्ये झळकले जिथे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धा पाहायला मिळाली. दोघांपैकी कोण व्यक्ती कोणाला चांगल्या प्रकारे हे सिद्ध करण्यासाठी बॉलीवूड-क्रिकेटच्या पॉवर कपलने मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली. इन्स्टाग्रामने (Instagram) त्यांच्या अधिकृत हँडलवर व्हिडिओ सामायिक केला आहे. व्हिडिओ सामायिक करताना, इंस्टाग्रामने लिहिले, " अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसोबत #टेकब्रेक. ती एक अभिनेत्री (अनुष्का शर्मा) आहे. तो एक क्रिकेट खेळाडू (विराट कोहली) आहे. ते एक पॉवर कपल आहेत. मैत्रीपूर्ण स्पर्धेला संपूर्ण नवीन अर्थ देणाऱ्या या लव्हबर्ड्सबरोबर # टेकअब्रॅक करण्याची वेळ आली आहे. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि मोठ्याने हसण्यासाठी तयार व्हा." अनुष्का आणि विराट डिसेंबर 2017 मध्ये लग्नबंधनात ढकले आणि सध्या ते मुंबईतील घरी क्वारंटाइन आहेत. ते बर्‍याचदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. (विराट कोहली 'ही' होममेड स्वीट डिश बनवून अनुष्का शर्माचे करतोय लाड, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी See Photo)

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने स्वतःची ओळख करुनव्हिडिओची सुरूवात केली. दोघांपैकी कोण कोणाला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखतात हे जाणून घेण्यासाठी दोघांनी एकमेकांना त्यांचे करिअर आणि एकमेकांबद्दल प्रश्न विचारले आणि अनुष्काला क्रिकेटविषयी जे माहित आहे यापासून सुरुवात करण्यात आली. त्यांनतर विराट हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल ज्यास बॉलिवूड देखील म्हणतातकाय माहित आहे हे जाणण्यासाठी अनुष्काने तीन प्रश्न विचारले. अनुष्काच्या पहिल्या प्रश्नाचे विराट उत्तर देऊ शकला नसला तरी त्याने पहिल्या फेरीच्या उर्वरित दोन प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपल्या आवडत्या व्यक्ती अनुष्काला प्रभावित केले. मात्र, बॉलीवूड अभिनेत्रीने क्रिकेटविषयी तिन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली आणि पहिली फेरी जिंकली. दुसरी फेरी बरोबरीत राहिली. प्रश्नांची उत्तरे देण्यात आणि एकत्र जोरात हसत या जोडप्याने प्रश्नांची उत्तरं देत खूप मजा केली.

 

View this post on Instagram

 

She’s an actress (@anushkasharma). He’s a cricket player (@virat.kohli). ⁣ They’re a power couple. ⁣ 😍💞😍 ⁣ It’s time to #TakeABreak with these lovebirds who give a whole new meaning to friendly competition. Learn more about them and prepare to smile big.

A post shared by Instagram (@instagram) on

दरम्यान, विराट काही दिवसानंतर आयपीएलद्वारे क्रिकेट मैदानावर दिसणार आहे. यावर्षी दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे होणार आहे. दुसरीकडे, अनुष्का कदाचित भारतीय महिला गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका साकारताना दिसली असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif