Virat Kohli-Anushka Sharma Daughter Name: विरुष्काच्या मुलीचं नाव आलं समोर, अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबत शेअर केला लेकीचा गोंडस Photo

आणि आता विरुष्काच्या मुलीचे नाव देखील समोर आले आहे. गेल्या महिन्यात मुलीच्या जन्मानंतर जोडप्याने पहिल्यांदा तिचा फोटो शेअर केला आणि त्यांनी आपले नाव 'वमिका' असे ठेवले असल्याचे उघड केले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वमिक (Photo Credit: Instagram)

टीम इंडिया कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरी 11 जानेवारी रोजी चिमुकलीचं आगमन झालं. विराटने सोशल मीडिया पोस्टद्वारे गुड न्यूज शेअर केली होती ज्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला. आणि आता विरुष्काच्या मुलीचे नाव देखील समोर आले आहे. गेल्या महिन्यात मुलीच्या जन्मानंतर जोडप्याने पहिल्यांदा तिचा फोटो शेअर केला आणि त्यांनी आपले नाव 'वमिका' (Vamika) असे ठेवले असल्याचे उघड केले. अनुष्काने पोस्ट शेअर करत म्हटले, की "आम्ही एकत्र प्रेम आणि कृतज्ञतेने राहत होतो, पण आमच्या छोट्याश्या वमिकाने आमच्या आनंदात आणखी भर घातली! अश्रू, हशा, काळजी, आनंद - कधीकधी काही मिनिटाच्या कालावधीत अनुभवल्या गेलेल्या भावना. झोप मायावी आहे परंतु आमची अंतःकरण भरले आहेत. आपल्या शुभेच्छा, प्रार्थना आणि चांगल्या ऊर्जेसाठी आपणा सर्वांचे आभार." (Virat Kohli Workout in Quarantine: विराट कोहली क्वारंटाइनमध्ये अशाप्रकारे राहतोय फिट, शेअर केला वर्कआऊट Video)

दरम्यान, अनुष्काच्या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत अनेक जण कमेंट्स करत असून जोडप्याला तसेच चिमुकलीला आशीर्वाद देत आहेत. अनुष्का आणि विराटच्या मुळीच जन्म मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात झाला. याबद्दल विराटने सोशल मीडियावरुन माहिती दिली होती आणि म्हटले होते की ‘आम्हाला सोमवारी दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या एकांताचा आदर राखला जाईव अशी अपेक्षा करतो.’ पहा विरुष्काच्या लाडक्या लेकीचा हा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

दरम्यान, चिमुकलीच्या जन्मानंतर विराट आता टीम इंडियाच्या ड्युटीवर परतला आहे. विराटने पहिल्या बाळाच्या जन्मा निमित्त पालकत्व रजा मागितली होती बीसीसीआयने मंजूर केली, त्यानंतर टीम इंडिया कर्णधार ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला होता. त्यामुळे, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून विराट मैदानावर कमबॅक करेल.