Ranji Trophy 2020 Final: बंगालविरुद्ध रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात जयदेव उनाडकटचा सुटला स्वतःवरचा ताबा, रागाच्या भरात तोडला स्टंप (Video)
साहा आणि चटर्जीची फलंदाजी चांगली होत असताना सामन्यादरम्यान सौराष्ट्रचा गोलंदाज जयदेव उनाडकट या भागीदारीमुळे इतका चिडला होता की संताप व्यक्त करताना दिसला.
राजकोट येथे खेळल्या जाणार्या रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी बंगालने (Bengal) 6 विकेट गमावून 354 धावा केल्या आहेत. बंगाल संघ अजूनही सौराष्ट्रच्या (Saurashtra) 71 धावा मागे आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बंगालचा अनुस्तुप मजूमदार 58 आणि अर्णब नंदी 28 धावा करून खेळत होते. बंगालकडून सुदीप चटर्जीने 81 धावा केल्या तर रिद्धिमान दोंघांनी साहाने 64 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली आणि संघाला मुश्किल स्थतीतून बाहेर काढले. साहा आणि चटर्जीची फलंदाजी चांगली होत असताना सामन्यादरम्यान सौराष्ट्रचा गोलंदाज जयदेव उनाडकट या भागीदारीमुळे इतका चिडला होता की संताप व्यक्त करताना दिसला. बंगाल डाव दरम्यान, सुदीपने 93 व्या षटकात उनादकटच्या गोलंदाजीचा बचावात्मक शॉट खेळला, जो फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाकडे गेली. जयदेवने मुद्दाम चेंडू पकडला आणि थेट स्टंपवर फलंदाजाकडे फेकला. बॉल लागताच मधला स्टंप तुटला. (Ranji Trophy 2020 Final: रोमांचक वळणावर सामना; अखेरच्या दिवशी बंगालला विजयासाठी 71 धावा, सौराष्ट्राला 4 विकेट्सची गरज)
चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी ही घटना घडली. चौथ्या दिवशी साहा आणि चटर्जीच्या व्यतिरिक्त, मजूमदार आणि अर्णब नंदी यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 91 धावांची भागीदारी केली आणि सामना ड्रॉ होण्याच्या साथीवर पोहचला आहे. सौराष्ट्राकडून धर्मेंद्रसिंह जडेजा आणि प्रेरक मांकड यांनी आजवर प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत, तर चेतन साकारिया आणि चिराग जानी यांनी अनुक्रमे 1-2 गडी बाद केले आहेत. व्हिडिओ:
चौथ्या दिवशी अनुस्तुप आणि नंदी यांनी आक्रमकता आणि बचावाचे उत्कृष्ट उदाहरण दर्शवत धावांची गती कायम ठेवली. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम दिवशी प्रेक्षकविना रिक्त स्टेडियममध्ये सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सरव्यवस्थापक सबा करीम म्हणाले की, शुक्रवारी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशास परवानगी देण्यात येणार नाही.