Varun Chakaravarthy New Record: वरुण चक्रवर्तीने एकाच वेळी अनेक विक्रम मोडले; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 28 जानेवारी रोजी मंगळवारी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव केला.

Photo Credit- X

India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (India vs England)यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 28 जानेवारी (मंगळवार) रोजी राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव केला. या विजयासह, पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला विजय नोंदवला. टीम इंडिया हा सामना हरली असली तर वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात चक्रवर्तीने 4 षटकांत 24 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेत 5 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू

गेल्या वर्षी टी-20 मध्ये पुनरागमन केल्यापासून वरुणने 10 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 10.16 च्या सरासरीने आणि 7.40 च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/17 आहे. आता एकूण 16 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर, त्याने 14.65 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 6.84 आहे. पाच विकेट्स घेत वरुण चक्रवर्तीने मालिकेत 10 विकेट्स पूर्ण केल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय टी-20 मालिकेत 10 विकेट्स घेणारा चक्रवर्ती आता पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

याशिवाय वरुण चक्रवर्तीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत एकूण 12 विकेट्स घेतल्या होत्या आणि आता त्याने इंग्लंडविरुद्धच्या फक्त 3 टी-20 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. 2 टी-20 मालिकांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करणार वरूण चक्रवर्ती हा भारतातील पहिला खेळाडू बनला आहे.

कुलदीप यादवला मागे टाकले

वरुण चक्रवर्तीने मालिकेतील गेल्या 10 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 27 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर होता. मेंडिसने 10 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहे. कुलदीपने 10 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 25 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक स्तरावर, तो सयाजरुल इद्रुस (मलेशिया, 18 विकेट्स) आणि अफगाणिस्तानचा रशीद खान (अफगाणिस्तान, 30 विकेट्स) नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

याशिवाय, भारतासाठी सर्वात कमी टी-20 सामन्यांमध्ये दोनदा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम वरुण चक्रवर्तीच्या नावावर आहे. वरुण चक्रवर्तीने 16 टी-20 सामन्यांमध्ये फक्त दोनदाच खाते उघडले आहे. तर यापूर्वी हा विक्रम कुलदीप यादवच्या नावावर होता. कुलदीपने 40 सामन्यांमध्ये दोनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. तर भुवनेश्वर कुमारने 87 सामन्यांमध्ये दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement