Rishabh Pant बरोबर भारतीय वनडे XI मधील स्पर्धेवर KL Rahul ने सोडले मौन, म्हणाला - ‘आरामात बसू शकत नाही’

कसोटीतील शानदार कामगिरीमुळे पंत एकदिवसीय आणि टी -20 संघात परतला आहे, ज्यामुळे राहुलवर आता अधिक चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे. पंतशी स्पर्धेबाबत राहुलने आपले मौन सोडले आहे.

केएल राहुल आणि रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलला (KL Rahul) कारकिर्दीतील एक कठीण स्थतीला सामोरे जावे लागत आहे जिथे त्याला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कायमस्वरुपी शिक्कामोर्तब करण्याची वेळ आता त्याच्या हातून निसटत आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन दौर्‍याच्या सुरूवातीपासूनच राहुल सातत्याने फॉर्मशी झगडत होता, विशेषत: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आणि मागील आठवड्यात इंग्लंडविरुद्ध (England) अंतिम टी-20 सामन्यातून त्याला वगळण्यात आले.  फॉर्ममध्ये असलेल्या रिषभ पंतच्या (Rishabh Pant) पुढे यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाल्यानंतर राहुलने महत्त्वपूर्ण खेळी खेळली. कसोटीतील शानदार कामगिरीमुळे पंत एकदिवसीय आणि टी -20 संघात परतला आहे, ज्यामुळे राहुलवर आता अधिक चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे. (IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, श्रेयसच्या जागी रिषभ पंतचा समावेश)

पंतशी स्पर्धेबाबत राहुलने आपले मौन सोडले आहे. राहुल म्हणाला की , “जेव्हा तुम्ही या भारतीय संघाचा सदस्य असता तेव्हा तुम्हाला नेहमीच ठाऊक असते की स्पर्धा मजबूत होईल. आपण कधीही मागे राहू शकत नाही किंवा आपल्या जागेबद्दल आत्मविश्वास बाळगू शकत नाही. ही चांगली गोष्ट आहे, आमच्या संघात उच्च प्रतिभा आहे, खेळाडू नेहमी येतात. संघातील एक खेळाडू म्हणून आपण नेहमी स्वत:ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि प्रत्येक उत्तीर्ण दिवस चांगले होण्यासाठी प्रयत्न करतात.” टी-20 मालिकेत खराब कामगिरीतून सावरल्यानंतर राहुलने वनडे मालिकेत शानदार सुरुवात केली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत 43 चेंडूत 62 धावा केल्या. राहुलच्या खेळीत 4 चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश होता.

राहुल म्हणाला, “एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मला क्रीजवर आणखी थोडा वेळ घालवण्याची संधी मिळाली. मी काही चांगले शॉट्स खेळले आणि फूटवर्क सुधारला.” राहुल म्हणाले, “आता मला अधिक आत्मविश्वास वाटू लागला आहे.” दरम्यान, आजच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पंतला दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. पहिल्या वनडे सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडावे लागले.



संबंधित बातम्या