U-19 World Cup Semi Final: भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सामना येत्या 4 फेब्रुवारीला रंगणार

या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा (Indian Team) मुकाबला पाकिस्तान संघासोबत (Pakistan Team) होणार आहे.

Mohammad Huraira and Rohail Nazir of Pakistan (Photo Credits: Twitter/@cricketworldcup)

साउथ अफ्रिका (South Africa) येथे खेळवण्यात येणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी (Under-19 World Cup) सुपर लीग सेमीफायनलचा सामना येत्या 4 फेब्रुवारीला होणार आहे. या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा (Indian Team) मुकाबला पाकिस्तान संघासोबत (Pakistan Team)  होणार आहे. भारताने आधीच ऑस्ट्रेलिया संघाला नमवत अंतिम चार मध्ये स्थान मिळवले आहे. शुक्रवारी झालेल्या सुपीर लीग क्वार्टर फायनलच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या संघाला 6 विकेट्सने हरवले आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 189 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने 53 बॉल शिल्लक राहिले असताा त्यांनी 4 विकेट्स देत (190/4) असा रन काढल्याने त्यांचा विजय झाला.

भारतीय संघाने 28 जानेवारीलाच सेनीफायनलमध्ये आपले स्थान पटकावले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला हरवत 74 धावांनी मात दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने मात्र 243 चे टारगेट असताना 159 धावा काढत हार स्विकारली. यापूर्वी भारताच्या ग्रुप ए ने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अंडर 19 वर्ल्ड कप सुपीर लीगमधील येत्या 4 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान आणि 6 फेब्रुवारीला न्युझीलंड विरुद्ध बांग्लादेश संघाचा सामना पार पडणार आहे.(IND vs NZ 4th T20I: सलग दूर सुपर-ओव्हर सामना जिंकत टीम इंडियाने रचला इतिहास, चौथ्या टी-20 सामन्यात बनलेले 'हे' रेकॉर्डस् जाणून घ्या)

Tweet:

अंडर 19 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक 4 वेळा विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सामन्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सुद्धा हा सामना दाखवला जाणार आहे.